For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara : फलटणमध्ये ऐतिहासिक श्रीराम रथोत्सव पारंपरिक पद्धतीने होणार साजरा

04:24 PM Nov 21, 2025 IST | NEETA POTDAR
satara   फलटणमध्ये ऐतिहासिक श्रीराम रथोत्सव पारंपरिक पद्धतीने होणार साजरा
Advertisement

                                   फलटण शहरात रथयात्रेचा उत्सव रंगणार

Advertisement

फलटण : फलटण येथे संस्थान काळापासून सुरु असलेला ऐतिहासिक श्रीराम रथोत्सव प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. आज मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर हा या यात्रेचा मुख्य दिक्स आहे. या दिवशी श्रीरामाचा रथ नगर प्रदक्षिणेसाठी निधणार असून दिवसभर परंपरागत मार्गाने नगर प्रदक्षिणा पूर्ण करुन सायंकाळी सात वाजता परत श्रीराम मंदिरात पोहोचणार आहे.

श्रीराम रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवार दि. १६ नोव्हेंबर पासून श्रीराम मंदिर परिसरात दररोज सायंकाळी ५ ते ७यावेळेत हभप खोमणे महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले. दररोण रात्री ९ ते ११ या वेळेत प्रभावळ, अंबारी, शेष, गरुह आणि मारुती या ५ वाहनांद्वारे परंपरागत पद्धतीने मिरवणूक काढली. प्रतिवर्षी प्रमाणे ही वाहने व मिरवणूक पाहण्यासाठी व दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. गुरुवार दि. २० डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत प्रभू श्रीरामाच्या रथाला लघुरुद्राभिषेक करण्यात आला व दुपारी रथास पोशाख करण्यात आला.

Advertisement

शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत श्रीराम मंदिरात कीर्तन झाल्यानंतर प्रभू रामचंद्राची मूर्ती राज घराण्यातील मान्यवरांच्या हस्ते रथामध्ये ठेवण्यात आल्यानंतर रथ सोहळा परंपरागत पद्धतीने शहरातील रथ मार्गावरुन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरुन फिरुन सायंकाळी ७ वाजता रथ सोहळा श्रीराम मंदिरात परत येईल. त्यानंतर शनिवार दि. २२ नोव्हेंबर रोजी श्रींची पाकाळणी, सकाळी काकड आरती आणि नंतर श्रीरामास ११ ब्राम्दांचा लघुरुद्र व महापूजा झाले नंतर कीर्तन होईल व त्यानंतर या यात्रेची सांगता होणार आहे.

नाईक निंबाळकर राजघराण्यातील साधी श्रीमंत सगुणामाता आईसाहेब महाराज यांनी सुमारे २६५ वर्षांपूर्वी रथयात्रेची ही प्रथा सुरु केली असून आजही परंपरागत पध्दतीने सुरु आहे. दरवर्षी मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेला माणजे देवदिवाळीच्या दिवशी प्रभू श्री रामाची सजविलेल्या रथातून नगर प्रदक्षिणा होते. ह्या उत्सवा दरम्यान शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. या यात्रेमध्ये विविध प्रकारची दुकाने असतात तसेच मोठे पाळणे है या यात्रेचे मुख्य आकर्षण असते.

Advertisement
Tags :

.