कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केंद्र सरकारचे ऐतिहासिक, धाडसी निर्णय अभिनंदनीय

12:31 PM Apr 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उत्तर गोवा जिल्हा पंचायत आमसभेत ठराव मंजूर

Advertisement

पणजी : केंद्र सरकारने घेतलेल्या ‘एक देश एक निवडणूक’, वक्फ कायद्यात करण्यात आलेली दुऊस्ती यासारख्या ऐतिहासिक निर्णयांचे बुधवारी झालेल्या उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या सर्वसाधारण सभेत स्वागत करुन पाठिंबा देण्यात आला आणि अभिनंदन करण्यात आले. सर्वसंमतीने तसा ठराव घेण्यात आला. त्याचबरोबर जिल्हा पंचायत स्थापनेचे यंदा 25 वे वर्ष असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले. या सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष शंकर चोडणकर यांनी ही माहिती दिली. त्यावेळी सचिव डॉ. अजय गावडे, उपाध्यक्ष निहारिका मांद्रेकर, सदस्य सिद्धेश नाईक आणि अन्य सदस्यांची उपस्थिती होती. विद्यमान जि. पंचायत मंडळाचे हे शेवटचे वर्ष असून पुढील आठ महिन्यानंतर निवडणूक होणार आहे. जि. पं. ची पहिली निवडणूक वर्ष 2000 मध्ये झाली होती. त्याला आता 25 वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे, असे चोडणकर यांनी सांगितले.

Advertisement

24 एप्रिल रोजी पंचायत दिवसाचे आयोजन

येत्या 24 एप्रिल रोजी पंचायत दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्त दिवसभर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. कला अकादमीत होणाऱ्या या कार्यक्रमात पंचायतीसाठी आतापर्यंत भरीव योगदान देणाऱ्या निवडक सरपंचांचा गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक मतदारसंघातर्फे  सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. त्यात प्रामुख्याने लोकनृत्य, कविता, चित्रकला, तसेच पंचायत राज या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा यांचा समावेश असेल, असे चोडणकर यांनी सांगितले. योगायोगाने त्या दिवशीच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचाही वाढदिवस असून त्या व्यस्त वेळापत्रकातूनही ते आम्हाला थोडा वेळ देतील, अशी अपेक्षा चोडणकर यांनी व्यक्त केली. त्याशिवाय कार्यक्रमास पंचायतमंत्री माविन गुदिन्हो आणि अन्य मान्यवर उपस्थित राहतील, अशी माहिती त्यांनी दिली. विद्यमान मंडळास साडेचार वर्षे पूर्ण झालेली असून या कार्यकाळात आमच्याकडून झालेले काम हे गत कोणत्याही मंडळाच्या कार्यकाळात झालेल्या कामापेक्षा निश्चितच अग्रेसर आहे. विकासाच्या बाबतीत आम्ही आघाडीवर राहिलो आहोत. सरकारने भरीव निधी दिल्यामुळे ही कामे करणे शक्य झाले. एवढेच नव्हे तर यंदाच्या अर्थसंकल्पातही जि. पं. साठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांनी ती शक्य तेवढ्या लवकर आम्हाला मंजूर करावी, असे आवाहन चोडणकर यांनी केले. डॉ. गावडे, सिद्धेश नाईक यांनीही यावेळी विचार मांडले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article