महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पुण्यात टेक ऑफनंतर हेलिकॉप्टर दरीत कोसळले! दोन पायलटसह तिघांचा दुदैवी मृत्यू

12:20 PM Oct 03, 2024 IST | Abhijeet Khandekar
Pune Unfortunate death pilots
Advertisement

पुणे / वार्ताहर
पुणे शहराजवळील बावधन परिसरात ऑक्सफर्ड कंट्री गोल्फ रिसॉर्ट येथील हेलिपॅडवऊन बुधवारी सकाळी उड्डाण घेतलेल्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ते दरीत कोसळले. या अपघातात दोन पायलटसह, एका अभियंत्याचा मृत्यू झाला.

Advertisement

या घटनेत हेलिकॉप्टरमधील पायलट गिरीश पिलाई व परमजीत सिंग आणि अभियंता प्रीतम भारद्वाज यांचा दुर्देवी मृत्यू झाला. दिल्ली येथील हेरिटेज एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या हेलिकॉप्टरने सकाळी सात वाजून 15 मिनीटांनी उड्डाण घेतले. मात्र, पाच ते सात मिनिटातच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ते बावधन येथील ऑक्सफर्ड ते के.के.कन्स्ट्रक्शन दरम्यानच्या टेकडीच्या दरीत कोसळले. घटनेची माहिती मिळताच, हिंजवडी पोलीस, अग्नीशामक दल, तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. हेलिकॉप्टर कोसळताना इंजिनने पेट घेतल्याने हेलिकॉप्टरचे तुकडे तुकडे होऊन ते परिसरात विखुरले गेले. तसेच जवळच पायलटचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत खुर्चीसह पडलेले दिसून आले, तर अभियंता देखील या दुर्घटनेत भाजला गेला होता. के.के.कन्स्ट्रक्शन टेकडीवर हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती एका नागरिकाकडून तसेच शासकीय ऊग्णवाहिका 108 कडून अग्नीशामक दलास मिळाली. त्यानुसार तातडीने वारजे, औंध, कोथऊड येथील अग्नीशामक वाहने तसेच मुख्यालयातून एक रेसक्मयू व्हॅन व पीएमआरडीए अग्नीशामक दलाकडून एक फायरगाडी व एक रेसक्मयू व्हॅन अशा एकूण चार फायरगाडया व दोन अद्यायवत रेसक्मयू व्हॅन घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळापर्यंत वाहन जाऊ शकत नसल्याने अडचण निर्माण झाली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण हेलिकॉप्टर जळून भस्मसात झाले होते. अग्नीशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्मयात आणली. तसेच हेलिकॉप्टरमधून जवळच तीन जणांचे मृतदेह पडले होते. जवानांनी स्ट्रेचरचा वापर कऊन तीन मृतदेह सुमारे अर्धा किलोमीटर चिखलातून चालत बाहेर आणले. घटनास्थळी अग्नीशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्यासह अग्नीशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर, शिवाजी मेमाणे, सुजित पाटील यांच्यासह 30 जवान कार्यरत होते.
काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे मुळशीमध्ये देखील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात झाला होता. परंतु हेलिकॉप्टरमध्ये असलेल्यांनी बाहेर उडया घेतल्याने ते बचावले गेले होते.

Advertisement

अपघाताची होणार चौकशी
हिंजवडी पोलिसांनी याबाबत सांगितले की, हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर हे ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट हेलिपॅड येथे मंगळवारी रात्री मुक्कामी होते. सकाळी साडेसात वाजता ही दुघर्टना घडली. घटनास्थळ हे डोंगराच्या बाजूस असल्याने मदतकार्य पोहचण्यासाठी थोडा उशीर झाला. हे हेलिकॉप्टर जुहू याठिकाणी जात होते. दिल्लीवऊन कंपनीचे पथक येऊन ते या अपघाताची पाहणी कऊन याबाबत सखोल चौकशी करतील. मयतापैकी एक पायलट नौसेनेतील निवृत्त अधिकारी होते. धुक्मयामुळे ही दुघर्टना घडली का, याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. तसेच डीजीसीए यांच्यामार्फत देखील या अपघाताची चौकशी करण्यात येईल.

सुनील तटकरे करणार होते प्रवास
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी याच टविन इंजिन ऑगस्टा बनावटीच्या हेलिकॉप्टरमधून मंगळवारी पुणे ते परळी असा प्रवास केला होता. त्यानंतर परळी येथून ते पुण्यात याच हेलिकॉप्टरने येऊन, नंतर कारने मुंबईला गेले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी मुंबईत त्यांना हे हेलिकॉप्टर घेण्यास जाणार होते. या हेलिकॉप्टरने मुंबई ते रायगड जिल्हयातील सुतारवाडी दरम्यान प्रवास करणार होते. त्यांना घेण्यासाठी बुधवारी सकाळी हेलिकॉप्टरने उड्डाण केले आणि काही वेळातच ते दुर्घटनाग्रस्त झाले.

Advertisement
Tags :
Pune Unfortunate death pilotsThe helicopter crashedthe valley
Next Article