अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये : आमदार नरके
नागपूर
सध्या कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्ह्याला पूरपरिस्थितीचा वेढा बसतो. यातच जर कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवली, तर त्याचा संपूर्ण फुगवटा या दोन जिल्ह्यामध्ये जाणार आहे. तरी आपले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून कर्नाटक सरकारच्या या कामाला स्थगिती द्यावी, अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी आज हिवाळी अधिवेशनात केले.
यावेळी ते म्हणाले, कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापूराचा धोका वाढणार आहे. त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचे काम थांबविण्याची गरज आहे. सध्या अलमट्टी धरणाची प्रकल्पीय संचित पातळी ५१९. ६० मीटर इतकी आहे. आणि आता त्याची संचित पातळी ५२४ मीटर करण्याचे नियोजन कर्नाटक सरकारने केले आहे. महापुरामध्ये या दोन्ही जिल्ह्यातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. गाव उद्घ्वस्त होत आहेत. विशेषःत कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग आणि सांगली जिल्ह्यात भयानक पुरपरस्थिती निर्माण होते. कर्नाटक सरकार धरणाची उंचा वाढवण्याची अंमल बजावणी करत आहे. यासाठीचे जमिनींचे हस्तांतरण करण्याचे काम सुरू आहे. जर अलमट्टी धरणाची उंची वाढली तर पुराचा विळखा इतका वाढू शकतो की या दोन्ही जिल्ह्यातील काही गावं राहणारही नाहीत. तरी या धरणाच्या उंची वाढवायच्या कामाला स्थगिती मिळावी, अशी मी सदनाला विनंती करतो, असे प्रतिपादन आमदार यांनी यावेळी केले.