कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अलमट्टी धरणाची उंची वाढू देऊ नये

03:17 PM Dec 21, 2024 IST | Pooja Marathe
The height of Almatti Dam should not be allowed to increase.
Advertisement

महाराष्ट्र सरकारने लक्ष घालावे
आमदार डॉ. राहुल आवाडे यांची मागणी
कोल्हापूर
कर्नाटक सरकारने पुन्हा अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्याला महाराष्ट्र सरकारने रोखावे त्याचबरोबर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात मंजूर मेडिकल कॉलेज सुरु करण्यासाठी शासनाने पाऊले उचलावीत, अशी मागणी आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी शुक्रवारी नागपूर हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्यावर बोलताना केली.
इचलकरंजी शहरात राज्य शासनाच्या वतीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय असे उपजिल्हा रुग्णालय सुरु आहे. सर्वसामान्यांसाठी आधारवड असलेले हे रुग्णालय सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे असावे आणि येथे येणारा कोणताही रुग्ण उपचाराविना परत जाऊ नये यासाठी माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून कोट्यावधीचा निधी प्राप्त होऊन हे रुग्णालय सुसज्ज बनत आहे. या रुग्णालयास असलेली 200 बेडची मान्यता 300 बेडची करण्यास तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिलेली आहे. त्याचबरोबर याठिकाणी मेडिकल कॉलेजही मंजूर झालेले आहे. परंतु ते सुरु होण्यासंदर्भात अद्याप कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. इचलकरंजी महानगरपालिका असून याठिकाणची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन याठिकाणचे मेडिकल कॉलेज तातडीने सुरु करण्यासंदर्भात कार्यवाही व्हावी, अशी मागणी आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी केली आहे.
काही वर्षांपासून कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिह्यांना महापुराचा फटका बसत आहे. त्यामुळे शेतीसह प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. त्याला कारणीभूत अलमट्टी धरणाची वाढती उंची जबाबदार असल्याचे मत आहे. एकिकडे महाराष्ट्र शासन कोल्हापूर व सांगली जिह्याची महापुराच्या विळख्यातून कायमस्वरुपी सुटका करण्यासाठी उपाययोजना करत आहे. परंतु कर्नाटक सरकारने यंदा पुन्हा अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय घेत त्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. जर अलमट्टीची उंची वाढविली गेली तर महापुराचा भयंकर मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने अलमट्टीची उंची वाढविण्यापासून कर्नाटक सरकारला रोखावे, अशी मागणीही आमदार डॉ. आवाडे यांनी केली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article