महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अवजड ट्रक नाल्यात कोसळला

11:46 AM Jul 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कणकुंबी-चोर्ला रस्त्यावर घडली घटना :  वाहनातील तिघेजण किरकोळ जखमी

Advertisement

वार्ताहर /कणकुंबी

Advertisement

बेळगावहून गोव्याकडे जाणारा अवजड वाहतूक करणारा  दहाचाकी ट्रक दहा फूट खोल नाल्यात कोसळल्याने वाहनातील तिघेजण किरकोळ जखमी झाल्याची घटना सोमवार दि. 29 रोजी सकाळी 10.30 वाजता घडली. सदर घटना कणकुंबी अबकारी तपासणी नाक्याला लागून असलेल्या एका मोठ्या नाल्यावर घडली. एपी 28 टी-बी 2794 हा दहाचाकी ट्रक फरशी घेऊन बेळगावहून गोव्याकडे जाताना चौकी व अबकारी तपासणी नाकादरम्यान असलेल्या ‘फुगीची नदी’ या मोठ्या नाल्यावर पुलाचा कठडा तोडून पलटी झाला. पाण्याचा भरपूर प्रवाह होता. गाडीत फरशा असल्यामुळे कलंडून नाल्यात कोसळला.

कठड्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी 

घटना घडल्यानंतर जवळच असलेले अबकारी अधिकारी, कर्मचारी तसेच चौकी येथील नागरिकांनी ट्रकचालक, क्लीनर व अन्य एका व्यक्तीला तातडीने रुग्णवाहिकेतून बेळगावच्या इस्पितळात पाठवून दिले. पुलाचा कठडा तुटून पडल्याने इतर वाहनांनासुद्धा धोका निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्वरित उपाययोजना करावी, अन्यथा रात्री-अपरात्री या मार्गावरून येणाऱ्या वाहनांचे अपघात होऊ शकतात. तरी प्रशासनाने त्वरित खबरदारी घ्यावी, अशी मागणी वाहनधारक व प्रवासी वर्गातून होत आहे.

अवजड वाहतूक बंद आदेशाकडे दुर्लक्ष

जिल्हाधिकाऱ्यानी बेळगाव-चोर्ला रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले असतानादेखील या रस्त्यावरुन कायमच अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. याला जबाबदार कोण, पोलीस खात्याकडून पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे का, पोलिसांचे आणि अवजड वाहन चालकांचे साटेलोटे आहे का, रात्री अवजड वाहने कुसमळी पुलाच्या पलीकडे येऊन थांबतात. आणि पहाटे तेथून निघतात, असे चित्र सध्या आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी वाहतूक बंद करण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा या पुलावर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article