कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सर्वात अवजड बॉम्ब

06:37 AM Aug 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जगातील सर्वात मोठा बॉम्ब हा ‘जार बॉम्ब’ होता, हा एक थर्मोन्युक्लियर एरियल बॉम्ब होता, जो सोव्हियत महासंघाने निर्माण केला होता आणि 1961 मध्ये याचे परीक्षण झाले होते. जार बॉम्बला एएन602 या नावानेही ओळखले जाते आणि हे आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली  आण्विक शस्त्र होते, ज्याची निर्मिती करत परीक्षण करण्यात आले होते. याची विस्फोट क्षमता 50 मेगाटन टीएनटी इतकी होती.

Advertisement

 

हिरोशिमावर पाडविण्यात आलेल्या अणुबॉम्बच्या तुलनेत याची विस्फोटक्षमता खुपच अधिक होती. हा बॉम्ब इतका अवजड होता की तो विमानाशी पॅराशूटद्वारे लटकवून देण्यात आला होता. याचबरोबर याच्या परीक्षणासाठी सोव्हियत महासंघाचे लढाऊ विमान तुपोलेव्ह-95 च्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आला होता. याचे परीक्षण रशियाने आजपासून सुमारे 60 वर्षांपूर्वी केले हेते. हा बॉम्ब इतका शक्तिशाली आहे, की पूर्ण शहर मातीत रुपांतरित करू शकतो. याचे परीक्षण आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली मानवनिर्मित विस्फोट होता. यात हिरोशिमावर पाडविण्यात आलेल्या बॉम्बच्या तुलनेत 3300 पट अधिक ऊर्जा निर्माण झाली होती.

Advertisement

जार बॉम्बला बॉम्बचा राजा असेही म्हटले जाते. या महाशक्तिशाली बॉम्बची निर्मिती सोव्हियत महासंघाच्या वैज्ञानिकांनी अमेरिकेचा मुकाबला करण्यासाठी केली होती. हा बॉम्ब 26 फूट लांब, 7 फूट रुंद आणि 27 टन वजनाचा होता. हा बॉम्ब कुठल्याही रशियन आण्विक बॉम्बरमध्ये फिट होऊ शकत नव्हता. याचे परीक्षण झाले असता विस्फोट स्थळापासून 1 हजार मैल अंतरावरील नॉर्वे आणि फिनलंडमध्ये अनेक घरांच्या खिडक्या तुटल्या होत्या.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article