महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुलींना छेडणाऱ्यांची मग्रुरीही धडकी भरवणारी...मुली व पालकांतही भिती

12:37 PM Aug 26, 2024 IST | Abhijeet Khandekar
girls scary fear among girls and parents
Advertisement

सकाळी 7 वाजताच ही टोळकी रस्त्यावर

सुधाकर काशीद

स्वसंरक्षणार्थ मुलींनी सज्ज असणे हे म्हणायला ठीक आहे . कराटेचा सराव असला पाहिजे हे देखील सांगायला सोपे आहे . पण शाळा कॉलेजच्या आसपास विखारी नजरेने फक्त घुटमळण्यासाठी येण्राया टोळक्यांची मग्रुरी पाहता एकटी दुकटी मुलगी तर त्यांचा प्रतिकार करणे केवळ अशक्य आहे .सुंदर मुलगी दिसली की या टोळक्यातल्या कोणाला तरी लगेच ती आपली वाटू लागते . त्याच्याकडून एकतर्फी प्रेमाला सुरुवात होते . तिचा प्रवास एकटीचा असेल तर तिच्या मागे पुढे दुचाकीवरून फ्रेया मारणे सुरू होते . मुलगी घाबरते . या घाबरलेल्या मुलीला नाव विचारले जाते . मोबाईल नंबरची मागणी केली जाते. ती कोठे राहते शाळा किंवा कॉलेजला कधी बाहेर पडते ,परत घरी कधी जाते याची माहिती या टो ळक्याकडून आधीच काढली जाते आणि मुलीला अक्षरश: हैराण हैराण करून सोडले जाते . कोल्हापुरात बहुतेक शाळा महाविद्यालयाच्या परिसरात हे आजची चित्र आहे .

Advertisement

मध्यमवर्गीय पालकांना तर हे चित्र धडकी भरवणारे आहे . एखादी घटना घडल्यावर अशा वातावरणाची चर्चा सुरू होते . मग पोलीस गस्त वाढवली जाते .थोडीफार कारवाई दिसायला सुरुवात होते . काही दिवसांनी हळूहळू सारी निवळते. पण असहाय्य मुलींना मात्र अशा टोळक्याकडून संधी मिळेल तेथे खूप काही सहन करावे लागते . घरी सांगितले तर ठतुझी तू सांभाळून राहा खाली मान घालून येत जा ठ असले सल्ले दिले जातात .तक्रार करावी तर या टोळक्याची आक्रमकता पाहून त्यांच्या नादाला लागायची पालकांना भीती वाटते . त्यामुळे या टोळक्यांची भीतीच मोडते व विशिष्ट शाळा महाविद्यालय व क्लासच्या परिसरात केवळ आपलेच राज्य आहे असे या टोळक्यांना वाटू लागते . आणि साहजिकच त्यांची दहशत वाढत जाते .

Advertisement

स्वत? शाळा कॉलेजला कधी वेळेत जाणार नाहीत . पण मुलींच्या शाळेसमोर कॉलेज समोर ही टोळकी सकाळी सव्वासातला तयार होऊन हजर असतात .त्यांना असे वाटते की आपण फार देखणे आहोत आणि मुलींनी त्यांना प्रतिसाद द्यावा. पण त्यांना प्रतिसाद मिळत नाही . मग ते आक्रमक होतात जेणेकरून मुली हैराण होतात . केवळ एकच नव्हे तर वेगवेगळ्या मुलींना ते अशा प्रकारे हैराण करत असतात . अगदी कोवळ्या वयातील या मुली पैकी एखादी त्यांच्या जाळ्यात फसते व या मुलीच्या वाट्याला नको ते सारे येते . आपण चुकलोय हे त्या मुलीला जाणवू लागते. व ती त्या मुलाला टाळू लागते . आणि त्यानंतर तर तिला अगदी वाईट अनुभवानां तोंड द्यावे लागते ती एवढी कोवळी पोर घरात सारं सांगू शकत नाही . पोलिसात तक्रार करू शकत नाही . आणि एकटीने प्रतिकार तर करूच शकत नाही .
कोवळ्या पोरींच्या मागे लागणारी किंवा निव्वळ यातच वेळ काढणारी ही टोळकी दुचाकीवरून इकडून तिकडे फक्त फ्रेया मारत असतात . आता पाचशे रुपयात एकावर एक फ्री अशा दोन पॅंटा दोन टी-शर्ट मिळतात .त्यामुळे कपड्यात त्यांच्या कपड्यात वैविध्य असते .केसाची स्टाईल तुर्रेबाज असते . पापाची तिकटी स्टाइल गावठी बुटाची जोडी पायात असते .मोबाईल खांदा व कानाच्या मध्ये धरलेला असतो माव्याने तोबरा भरलेला असतो . मनगटात दोरे असतात . ते त्या द्रोयाचा मूळ रंग कळण्यापलीकडचे असतात . आणि मोटरसायकल आडव्या तिडव्या लावून ते खिदळत उभे असतात .काही मुलींच्या घरचा पत्ता शोधून काढून दिवसभरात दोन-तीन फ्रेया हमखास मारतात .आपली मोटरसायकल ओळखावी म्हणून हॉर्नचा विशिष्ट पद्धतीने आवाज करतात .

त्यांच्या असल्या रूपाला अनेक मुली दाद देत नाहीत .पण काही जणी मात्र एखाद्या निसटत्या क्षणी फसतात . आणि स्वत?ची बरबादी करून घेतात . सकाळी साडेसात वाजता शिवाजी पुलावरून पुढे अशा मुली मोटरसायकलवर मागे बसून ओढणीने तोंड बांधून कोठे जातात हे कळाले तरी ते खूप भयानक आहे . त्यामुळे पन्हाळ्याच्या अलीकडे बुधवार पेठेतच अशा मोटारसायकली पोलिसांनी अडवणे गरजेचे आहे. अनेक मुलींची बरबादी त्यामुळे रोखली जाऊ शकणार आहे. पन्हाळा हे झाली केवळ एक छोटेसे उदाहरण .पण चित्रनगरी परिसरात तर अशा मुला-मुलींसाठीच निवारे बांधले आहेत असे वाटणारी ठिकाणे आहेत . एकदा छापा मारला तर अतिशय भयाण वास्तव सामोरे येणार आहे . अशी असंख्य नवनवीन ठिकाणे कोल्हापूर परिसरात तयार झाली आहेत . कोल्हापुरात शेतवडीतील लॉजचा व्यवसाय यामुळेच तेजीत आहे.

या टोळक्यांना रोखण्यासाठी निर्भया पथक आहे .पण या पथकाला अट्टल रोड रोमिओ कधीच मिळत . पोलीस गाडी आली म्हणून भिऊन पळणारे नवरे या पथकाच्या ताब्यात सापडतात. अट्टल रोमिओ मात्र सेफ राहतात .अर्थात हे .रोखायची पूर्ण जबाबदारी फक्त पोलिसांची नाही . काल कागल येथे पेट्रोल पंपावर जागरूक कर्मच्रायांनी एका रोमिओ पासून एका शाळकरी मुलीला वाचवले तशीच जागरूकता इतरांनीही दाखवली पाहिजे .स्वत?ला युवा नेता म्हणण्रायांनी अशा टोळक्यांवर जरब बसवली पाहिजे . तालमीची परंपरा सांगण्राया तालमीच्या कार्यकर्त्यांनी अशा टोळक्यांना जाग्यावर बदडून काढले पाहिजे. पोलिसांनी त्यांना माहित नाही असे नाही, पण असंख्य निवांत निवारे शोधून काढले पाहिजेत .तिथे कारवाई केली पाहिजे तरच फार थोडा आळा बसु शकणारआहे. नाहीतर अशा घटना वारंवार होतच राहणार आहेत.

Advertisement
Tags :
girls and parents
Next Article