For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यातील निवडणुकांचा महासंग्राम निर्विघ्नपणे!

06:10 AM Nov 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्यातील निवडणुकांचा महासंग्राम निर्विघ्नपणे
The great battle of elections in the state goes on smoothly!
Advertisement

राज्यात सर्व अंदाज मोडीत काढत महायुतीने इतिहास गाजविला. 200 आकडा पार करीत एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला. गेल्या एक महिन्यापासून राज्यात सुऊ असलेला विधानसभा निवडणुकांचा महासंग्राम अखेर निर्विघ्नपणे पार पडला. याचे सर्व श्रेय हे राज्य पोलीस दल तर मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे. कोणताही अनुचित प्रकार न घडता मुंबईतील निवडणुकांचा महासंग्राम यशस्वीरित्या पार पडला. योग्य मार्गदर्शन, कणखर नेतृत्व आणि काटेकोर नियोजनाच्या जोरावर फणसाळकर यांनी निवडणूक बंदोबस्ताचे शिवधनुष्य लिलया पेलले.

Advertisement

‘न भुतो न भविष्यती’ अशी कामगिरी करीत महायुती आघाडीने 200 आकडा पार केला. तर भारतीय जनता पक्षाने अनोखा विक्रम रचत 132 जगांवर विजय मिळविला. गेले महिनाभर विविध प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रांनी दिलेल्या निवडणुकांचे अंदाज नेमके कशाप्रकारे असतील, याचे देखील वेध या वृत्तवाहिनी आणि प्रसारमाध्यमांना लागले होते. तर राज्यात कोण बाजी मारणार, याची चर्चा शहरातील गल्लो-गल्ली सुऊ होती. अनेकांचा कल हा महायुती काठावर येईल तर काही जणांचे मत महाविकास आघाडीच्या पारड्यात होते. मात्र या सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवित महायुतीने मोठ्या फरकाने बाजी मारली. फरक एवढा की राज्यात विरोधी पक्षच शिल्लक राहिला नाही. तर दुसरीकडे या निवडणुका व्यवस्थित आणि सुरळीतपणे पार पाडण्याचे संपूर्ण श्रेय हे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे आहे. मुंबईतील निवडणुकांना कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये, यासाठी त्यांनी थ्री टायर स्वऊपाचा बंदोबस्त ठेवला होता. तर ते स्वत: रात्रं]िदवस लक्ष ठेऊन होते. निवडणुकादरम्यान निवडणूक आयोगाने अचानक अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याने, कमी काळात चोख बंदोबस्ताचे मोठे आव्हान विवेक फणसाळकर यांच्यावर होते. मात्र त्यांनी हे आव्हान लिलया पेलून निर्विघ्नपणे राज्यातील निवडणुकांचा महासंग्राम पार पाडल्याने, त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव सुऊ आहे.

पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी केलेले नियोजन आणि त्याची प्रत्येक अंमलबजावणी त्यांच्या नेतृत्वाखाली झाल्याने, बंदोबस्तावर असलेला पोलीस अधिकारी-कर्मचारी वर्ग देखील आनंदित होता. कारण हा बंदोबस्त पार पाडत असताना प्रत्येक अधिकारी-कर्मचारी हा 48 तासाहून अधिक काळापर्यंत बंदोबस्तावर होता. मात्र या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडाही त्रस्तपणा नव्हता. याऊलट सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे चेहरे अगदी टवटवीत असल्याचे आढळून आले. याचे सर्व श्रेय अर्थातच हे पोलीस आयुक्तांना असल्याची भावना या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या धडाक्यात महाविकास आघाडीत आत्मविश्वास दुणावला होता. हा आत्मविश्वास नसून अतिआत्मविश्वास असल्याचे अनेकांच्या लक्षात येत होते. त्याचाच फटका यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रामुख्याने त्यांना बसला. तर दुसरीकडे अगदी कमी काळात राज्यातील जनतेच्या गळ्यातील ताईत बनलेले फडणवीस-शिंदे सरकारने जोरदार कामाला सुऊवात केली होती. यामुळे या निवडणुकांचा महासंग्राम म्हणजे पोलीस आयुक्तांसमोर मोठे आव्हान होते. राज्यातील अनाकलनीय अशी राजकीय परिस्थिती त्यात मुंबईसारख्या शहरात तर आणखी जटील परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र या सर्व परिस्थितीला पुऊन उरत पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी बंदोबस्तासाठी योग्य ते नियोजन केले होते. अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताचे प्रशिक्षण देण्यास सुऊवात केली. त्यांचे वर्ग घेत आवश्यक त्या सूचना करण्यास सुऊवात केली.

Advertisement

अशातच निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या नाना पटोले यांच्या पत्राची दखल घेत तत्कालीन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना तत्काळ हटवित त्यांच्या जागेवर नवीन पोलिस महासंचालक नेमण्याचे आदेश दिले. त्यावेळी विवेक फणसाळकर यांची पोलीस महासंचालक पदावर वर्णी लागणार या बातम्यांना ऊत आला. मात्र ऐनवेळी पोलीस महासंचालक पदी संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. त्यातच मुंबई शहरातील जवळपास 100 हून अधिक अधिकाऱ्यांची निवडणूक आयोगाने बाहेर उचलबांगडी केली. यामुळे आहे त्या अधिकाऱ्यांमध्ये तसेच बाहेऊन येणाऱ्या नवख्या अधिकाऱ्यांना बरोबर घेत बंदोबस्त करण्याचे शिवधनुष्य फणसाळकर यांना पेलावे लागले. ते देखील त्यांनी यशस्वीरित्या पेलले.  मतदानाच्या दिवशी बंदोबस्त सुऊ असताना देखील ज्येष्ठ नागरिक, अपंगांना मदत करण्याचे काम पोलीस अधिकारी-कर्मचारी करीत होते. तेही अगदी अतिउत्साहाने. का? तर याचे नियोजन स्वत: पोलीस आयुक्तांनी केले होते. त्यासाठी शहरातील अनेक ठिकाणी पोलीस आयुक्त फणसाळकर हे जातीने हजर राहुन नियोजन करीत होते.

राज्यातील निवडणुकांचा महासंग्राम शांततेत पार पाडण्याकरीता मुंबई पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. त्यातच अचानकपणे निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने कधी नव्हे ते अनेक मोठ्या नेत्यांच्या हेलिकॉप्टर त्यांच्या साहित्यांची चाचपणी करण्यास सुऊवात केली होती. राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या पक्षांच्या नेत्यांची झडती होत असल्याने, याचा फायदा काही समाजकंटकांनी घेऊ नये, कार्यकर्त्यांना भडकाऊन कुठेही हिंसक वातावरण निर्माण करू नये, यासाठी देखील पोलीस दल सज्ज होते. राज्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द कऊन, त्यांना बंदोबस्ताकरीता तैनात करण्यात आले होते. शहरातील सर्व मतदारसंघातील पोलीस आयुक्तांनी पाहणी केल्यानंतर तात्काळ मुंबईत 25 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्याचा आदेश पोलीस आयुक्तांनी दिला. 5 अप्पर पोलिस आयुक्त, 20 पोलीस उपायुक्त, 83 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2 हजारहून अधिक पोलीस अधिकारीदेखील सज्ज झाले होते. प्रथम शहरातील सर्व भागात 24 तास गस्त वाढविण्यात आली. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता खबदारी म्हणून पोलिसांनी जे संशयीत आहेत, अशांची उचलबांगडी करण्यास सुऊवात केली.

संपूर्ण शहरात मिशन ऑल आऊट राबविण्यात आले. जेणेकऊन, शहरात निवडणुकीच्या धामधुमीत या संशयीतांनी कोणताही अनुचित प्रकार घडवू नये, याकरीता पोलिसांनी प्रथमच ही काळजी घेण्यास सुऊवात केली. तसेच शहरात सर्वात जास्त सुऊ असलेल्या अंमली पदार्थाच्या तस्करांवर लक्ष केंद्रीत कऊन त्यांना अटक केली. विदेशातून शहरात येणाऱ्या खास विदेशी पाहुण्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत करण्यास सुऊवात केली. एखादी संशयीत विदेशी व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन हॉटेल मालक, गेस्ट हाऊस मालकांना केले होते. पोलीस आयुक्तांचे मार्गदर्शन आणि कुशल नेतृत्वामुळे शहरातील सर्व निवडणुका अगदी शांततेत पार पडल्याने, पोलिसांनी एकच निश्व:स सोडला. कर्तव्य बजावित असताना कुटुंबाची असलेली जबाबदारी, त्यांच्या समस्या आदी बाबींकडे कानाडोळा करीत, केवळ नागरिकांच्या सुरक्षितेकरीता, तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरीता पोलिस दलाने डोळ्यात तेल घालून चोख बंदोबस्त ठेवला. यामुळे काही समाजकंटकांना मनात असतानादेखील विध्वंस घडविता आला नाही. कारण काही अनुचित प्रकार करीत असताना सापडल्यास, मुंबई पोलिसांचा हिसका कसा असतो, याची कल्पना या समाजकंटकांना आहे. यामुळे काही अनुचित करण्यापेक्षा आलेल्या परिस्थितीला शांततेने सामोरे जाणे यातच शहाणपण असल्याचा समज कऊन घेऊन या समाजकंटकांनी देखील माघार घेतली. अखेर याचे सर्व काही श्रेय हे मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे आहे.

- अमोल राऊत

Advertisement
Tags :

.