महायुती सरकारला शेतकरी कधीच लाडका वाटला नाही : सगळा पैसा एकाच योजनेकडे वळवला
ठाकरे पक्षाचे खा. संजय राऊत यांची सरकारवर टीका
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील सरकारकडे वायफळ काम करायला पैसे आहेत. मात्र त्यांना शेतकरी लाडका कधीच वाटला नाही. पाच-पंचवीस कोटी शेतकऱ्याच्या पुनर्वसनासाठी द्यावेत, अशी मानसिकता महायुती सरकारची नसून राज्यातील सगळा पैसा एकाच योजनेकडे वळवला असल्याने शेतकऱ्यावर आफत कोसळली असल्याची टीका ठाकरे पक्षाचे खा. संजय राऊत यांनी केली. मराठावाड्यात पूरस्थिती उद्भवली असल्याने ठाकरे पक्षाचे प्रतिनिधी मराठवाड्यात दौऱ्यासाठी जाताना राऊत म्हणाले. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आ. आदित्य ठाकरे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे मराठवाड्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी राऊत बोलत होते.
वर्षा निवासस्थान आरोपींना लपण्याची सुरक्षित जागा
मालवण येथील पुतळा कोसळल्याप्रकरणी मूर्तीकार जयदीप आपटेवर बोलताना राऊत म्हणाले की, आपटे का भेटत नाही. त्याच्यासाठी लूकआऊट नोटीस जारी केली. म्हणजे तो पोलिसांच्या हाती लागत नाही. याचाच अर्थ या राज्याचे गृहखाते आणि सरकार काय करत आहे, असा सवाल राऊत यांनी विचारला. म्हणजेच सरकारने त्यांच्या लपण्याची अत्यंत सुरक्षित जागेची सोय केली असणार असा आरोप ही त्यांनी केला. वर्षा शिवाय आरोपींना लपण्यासाठी दुसरी जागा होऊच शकत नाही. म्हणून आरोपी भेटत नसल्याचा आरोप राऊत यांनी केला.