सरकार दिलेला शब्द पाळत नसेल तर...बच्चू कडूंचा शिंदे सरकारला घरचा आहेर
24 डिसेंबरपर्यंत शेवटची मुदत मागितलेल्या सरकारने अजूनही कोणतेही ठोस पाऊले उचललेली नाहीत. तसेच दिलेल्या मुदतीमध्ये आरक्षणामचा मुद्दा मार्गी लावता आला नाही. त्यामुळे दिलेला शब्द सरकारला पाळता आला नाही हे खुपच दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे मागच्या वेळी झाली तशी फसवणूक आता होऊ नये अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणा दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार बांधिल आहे आणि त्यासाठी आपल्याला 24 डिसेंबरपर्यत वेळ द्यावी असे आवाहन मनोज जरांगे यांना दिले होते. त्यानंतर. त्यानंतर 2 महिने उलटूनही सरकारने आपला कोणताच निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे उद्या मनोज जरांगे पाटील काय भुमिका घेणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्याला मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत संपत असून कायद्यात बसणारे मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारला अजून थोडी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी करणारे शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिंष्टमंडऴाने मनोज जरांगे यांच्याकडे मुदत वाढवून मागितली पण मनोज जरांगे त्यांची मागणी फेटाळली.
कालच्या बैठकीनंतर शिंदे- फडणवीस सरकारचे सहयोग बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले "या अगोदर सरकारने मराठा समाजाकडे मुदत मागितली. त्यावेळी सरकारने शब्द दिला होता. सरकारने सगे सोयरे या शब्दाचा चुकिचा अर्थ काढला आहे पण आता सरकार शब्द पाळणार नसेल तर हे खुपच दुर्दैवी आहे." त्यांनी आपले मत व्यक्त केले.