राज्यपाल निवासस्थानाचे आता होणार ‘लोकभवन’
11:05 AM Dec 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : केंद्रीय गृहखात्याच्या निर्देशानुसार कर्नाटकातील राजभवनाचे भविष्यात ‘लोकभवन’ असे नामकरण केले जाणार आहे. यापूर्वीच पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गुजरातसह 8 राज्यांनी राजभवनाचे नाव बदलून लोकभवन असे केले आहे. आता कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत लवकरच राजभवनाचे नाव बदलून लोकभवन असे करण्याबाबतचा अधिकृत आदेश जारी करतील. राजभवन हे राज्यपालांच्या अखत्यारित येत असल्याने नाव बदलण्यासाठी राज्य सरकारची संमती किंवा परवानगी आवश्यक नाही. ते राष्ट्रपती भवनाच्या अखत्यारित येत असल्याने त्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशांचे पालन करावे लागते.
Advertisement
Advertisement