For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेतकरीही लाडका असल्याचे सरकारने दाखवावे! मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सरकारला पत्र

03:28 PM Sep 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
शेतकरीही लाडका असल्याचे सरकारने दाखवावे  मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सरकारला पत्र
MNS chief Raj Thackeray
Advertisement

मराठावाड्यातील पावसामुळे शेतकरी हवालदिल

मराठवाड्यात होणाऱ्या पावसामुळे तेथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा वेळी राज्य सरकारने त्वरित विशेष मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारला पत्र लिहून शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावे. त्यासाठी राज्यसरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल ते पहावे, असे आवाहन राज्य सरकारला केले आहे.

Advertisement

राज ठाकरे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर हे पत्र पोस्ट केले आहे. ते म्हणतात की, सस्नेह जय महाराष्ट्र, गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिह्यांमध्ये शेतीचे अमाप नुकसान झाले आहे. कित्येक पिके अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभे झालेले पीक नष्ट होणे आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणे कठीण आहे. राज्यसरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल ते पहावे. शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावे, असे ते म्हणाले.

तसेच मराठवाड्यातील महाराष्ट्र सैनिकांनी देखील प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झटपट होत आहेत ना, नसल्यास ते करायला लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल हे पहावे. यात अजून एक गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्याने जमीन ओली झालेली असते, आणि ती सुकायला वेळ लागतो, यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वच जण आजारी पडतात. त्यामुळे ज्या घरांत पाणी शिरले आहे अशा ठिकाणी प्लॅस्टिकच्या शीट्स पोहचतील किंवा जुने फ्लेक्स तरी पोहचतील हे बघावे! किमान त्या निमित्ताने तरी पुढारी जनतेच्या घरात पोहोचतील आणि आजपर्यंत आपले वाटोळ कोणी केले तेही जनतेला समजेल !

Advertisement

या सगळ्यात सरकारने पण मदतीचा हात आखडता अजिबात घेऊ नये, आणि सणासुदीच्या सुट्ट्dया असल्या तरी हा कठीण प्रसांग आहे हे लक्षात घेऊन, प्रशासनाला कामाला लावून नुकसान भरपाई गणपतीच्या सणाच्या काळात मिळेल असे करावे, असे आवाहन राज यांनी केले आहे.

Tags :

.