महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सरकारने अगोदर कुळमुंडकार कायद्यात बदल करावा

12:24 PM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाटकारांना जमिनीचे मालक असल्याचे सिद्ध करायला लावा : सरकारने विधानसभेत कायदा करण्याचा ठराव धारगळ येथील जनजागृती बैठकीत संमत

Advertisement

पेडणे : सरकारने जसे कुळ मुंडकारांना तुम्ही कुळ मुंडकार आहात हे सिद्ध करण्यासाठी अर्ज करण्यास सांगितले आहे तसेच जमीनदार, कब्जेदार म्हणून नोंद असलेल्यांना ते मालक आहेत हे सिद्ध करण्यास लावणारा बदल कुळ व मुंडकार कायद्यात सरकारने करावा. त्यानंतरच खटल्यांना सुऊवात करावी, अशी जोरदार मागणी करणारा ठराव सर्वानुमते धारगळ येथे आयोजित कुळ मुंडकार जनजागृती बैठकीत मंजूर करण्यात आला. पेडणे तालुका नागरिक समिती राज्यातील 13 ही तालुक्मयामध्ये कुळ मुंडकार जनजागृतीच्या बैठका घेत आहे. त्याच अनुषंगाने समितीने रविवारी सकाळी धारगळ येथील कामपुऊष देवस्थानच्या मंडपात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला समितीचे अॅड. सदानंद वायंगणकर, उपाध्यक्ष व्यंकटेश नाईक, समितीचे अध्यक्ष पुंडलिक धारगळकर आदी व्यासपीठावर होते.

Advertisement

पेडणे तालुक्मयातील बारा पैकी 10 कोमुनिदाद जागा गेल्या कुठे?

अॅड. सदानंद वायंगणकर यांनी यावेळी सविस्तरपणे कुळमुळंकारसंबंधी कायदे त्यातील पोट कलम याविषयी सविस्तर माहिती दिली. पोर्तुगीज सरकार गेल्यानंतर राज्यात केंद्र सरकारने राज्य सरकारची स्थापना केली. त्यावेळी राज्यात आणि पेडणे तालुक्मयात 12 कोमुनिदाद जमिनींची नोंद केली होती. त्यापैकी केवळ दोन जागा एक चोपडे आगरवाडा आणि दुसरी इब्रामपूर येथे आहे मग इतर दहा कोमुनिदादच्या जागा गेल्या कुठे? असा सवाल त्यांनी केला.

अन्यथा चाळीसही आमदारांच्या विरोधात मतदान करावे लागेल

पेडणे तालुका नागरिक समिती मोहिमेद्वारे नागरिक कुळ मुंडकारांच्या सह्या घेऊन त्या सह्यांचे निवेदन स्थानिक आमदार, सरकार यांना सादर केले जाईल आणि त्या त्या स्थानिक आमदारांनी विधानसभेमध्ये कुळमुंडकार कायद्यात बदल कऊन वरील ठराव मंजूर कऊन घ्यावा. जर आमदारांनी या ठरावाच्या बाजूने मतदान केले नसेल किंवा कुळमुडकारांच्या हक्कासाठी न्यायालय न्याय मिळवून दिला नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांच्या विरोधात मतदान करावे लागेल, असा इशारा सदानंद वायंगणकर यांनी दिला. यावेळी समितीचे उपाध्यक्ष व्यंकटेश नाईक यांनी कुळमुंडकाराची व्याख्या आणि कशा प्रकारच्या घटना घडतात, खटले न्यायालयात जातात आणि कुळमुडकरांचे खटले निकाली लागत असताना भाटकरांच्या नावावर जमीन कशी होते याचे एक एक उदाहरण देत स्पष्ट केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी वेगवेगळे प्रŽ आणि शंका उपस्थित करून शंकेचे निरसन करून घेतले. यात युवकांचा जास्त भरणा होता. ज्येष्ठ नागरिकही या बैठकीला उपस्थित.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article