कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शासनाने वडाप वाहतुकदारांचा विचार करावा

03:00 PM Jul 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महिलांना मोफत बसप्रवासामुळे अनेक वडाप व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

Advertisement

वार्ताहर/उचगाव

Advertisement

कर्नाटक शासनाने महिलांकरिता बसप्रवास मोफत केल्याने टेम्पो, वडाप रीक्षा व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. युवकांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. व्यवसाय नसला तरी टेम्पो, वडाप रिक्षा या वाहनांचे हप्ते भरत राहण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. कर्नाटक सरकारने महिलांकरिता बसप्रवास मोफत योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. त्याचा दुष्परिणाम मात्र आज हजारो टेम्पो, वडाप रिक्षा व्यावसायिकांवर झाला आहे.

टेम्पो, वडाप रिक्षा ग्रामीण भागातून शहरापर्यंत ये-जा करत होते. पूर्वी हा व्यवसाय तेजित होता. याच्यातून मिळणाऱ्या मोबदल्यावर ते आपली उपजीविका, घरसंसार चालवत असत. मात्र सध्या महिलावर्ग पूर्णपणे बसमधूनच प्रवास करत असल्याने रिक्षा, टेम्पो बसस्टॅन्ड वरती लावून प्रवाशांची वाट बघत बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तासन्तास जरी वाट पाहिली तरी प्रवासी येऊन लागत नाहीत. पुरुष मंडळी दुचाकी, चारचाकी वाहनांचा उपयोग करतात. विद्यार्थी, विद्यार्थिनी बसपासद्वारे प्रवास करतात. महिला पूर्णपणे बसनेच प्रवास करतात. यामुळे सध्या टेम्पो, वडाप रिक्षा व्यवसायच मोडकळीला आला आहे.

बसफेऱ्या रद्द-प्रवाशांचे हाल

लग्नसराई, यात्राकाळात बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येते. सदर प्रवासी मात्र बसचीच प्रतीक्षा करत असतात. जरी बस स्टॅन्डवरती टेम्पो, वडाप रिक्षा जरी उभ्या असल्या तरी यामध्ये बसणे टाळतात. कारण बसप्रवास मोफत असल्याने ते पूर्णपणे बसवरतीच अवलंबून असतात. मात्र अशावेळी बसफेऱ्या रद्द झाल्या, तसेच काही भागात बसफेऱ्यांची संख्या कमी असल्याने तसेच अशा गावांमधून सध्या वडाप रिक्षा, टेम्पो यांनी हा व्यवसाय बंद केल्याने तेथे प्रवाशांची मात्र मोठी कुचंबना होते. दोन दोन, तीन तीन तास बस येत नसल्याने बसची प्रतीक्षा करत थांबण्याची वेळ अनेकवेळा प्रवाशांवरती येते. यावेळी या प्रवाशांना टेम्पो, वडाप रिक्षाची आठवण होते. मात्र हा व्यवसाय काही गावातून बंद केल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहेत. शासनानेच यावर काही तोडगा काढावा. आणि या व्यावसायिकांवर ओढवलेल्या संकटातून दूर करावे, अशी मागणी या वाहनधारकांतून करण्यात येत आहे.

बँकांचे हप्ते भरणे बनले मुश्किल 

ग्रामीण भागातील अनेक युवकांनी व्यवसायात गुंतण्यासाठी आणि आपली उपजीविका चालवण्यासाठी सदर वाहने खरेदी केली. वाहने खरेदी करण्यासाठी या युवकांनी अनेक सहकारी पतसंस्था, बँकांमार्फत मोठी कर्जे घेतली आहेत. आज त्यांचे हप्ते भरणेही मुश्किल होऊन बसले आहे. सदर टेम्पो, वडाप रीक्षा विकावं म्हटले तरी याला आज मागणी नाही. त्यामुळे जगावे की मरावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर आवाचून उभा आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article