कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

साताऱ्याच्या दिक्षाची सुवर्णसकाळ

06:10 AM May 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सागरी जलतरणात 1 सुवर्णासह 2 कांस्य : सिलट प्रकारातील दुहेरीत सुवर्णपदक

Advertisement

वृत्तसंस्था/ दीव 

Advertisement

भल्या पहाटे रंगलेल्या पहिल्या खेलो इंडिया बीच स्पर्धेतील सागरी जलतरणात दिक्षा यादवच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राने स्पर्धेतील सुवर्ण सकाळ अनुभवली. 10 मीटर स्विमथॉन प्रकारात महाराष्ट्राने दिक्षाच्या सुवर्णपदकासह 2 कांस्यपदकांची कमाई केली. बीच पेंचक सिलटमध्ये देखील महाराष्ट्राने स्पर्धेतील पहिले सुवर्णयश संपादले. 2 सुवर्णांसह 9 पदकांची लयलूट करीत महाराष्ट्र पदकतक्यात तिसऱ्या स्थानावर आहे.

दीवच्या अरबी समुद्रात पहाटे 6 वाजता 10 मीटर स्विमथॉनचा थरार रंगला. महिलांच्या गटात सुरूवातीपासून महाराष्ट्राच्या 19 वर्षीय दिक्षा यादवने मुसंडी मारली होती. 2 मिनिटे 18.09 सेकंद वेळेत शर्यतीचा पल्ला पार करीत दिक्षाने सुवर्णपदक पटकावले. रौप्य व कांस्य पदकांसाठी अनुक्रमे महाराष्ट्राच्या पूर्वा गावडे व तामिळनाडूच्या एम. आरना यांच्यात शर्यत रंगली. दोघींनीही एकाच वेळी अंतिम रेष पार केली. अवघ्या 14 दशांश सेकंदाने पूर्वाला रूपेरी यशाने हुलकावणी दिली. 2.18.38 वेळ देत आरनाने रौप्य, तर 2.18.52 वेळ नोंदवून पूर्वाने कांस्यपदक जिंकले.

सिंधूदुर्गच्या पूर्वा गावडेला कांस्य

साताऱ्यातील दिक्षा आणि सिंधूदुर्गच्या पूर्वा या दोन्ही खेळाडू पुण्यातील शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीत सराव करतात. 50 मीटर फ्रीस्टाईल खेलो इंडिया विद्यीपीठ स्पर्धेतही दिक्षाने पदक जिंकले आहे. मुलांच्या स्विमथॉन प्रकारातही महाराष्ट्रचे जलतरणपटू चकमले. चैतन्य शिंदेने 2.13.14 वेळ देत कांस्यपदकाचे यश संपादन केले. कर्नाटकच्या रेणुकाचार्या होदमानीने सुवर्ण, तर पश्चिम बंगालच्या पृथ्वी भट्टाचार्याने रौप्यपदक कमवले.

पेंचक सिलट प्रकारात महाराष्ट्राला सुवर्ण

घोघला समुद्र किन्रायावर सुरू असलेल्या पारंपारिक पेंचक सिलट प्रकारात महाराष्ट्राच्या रिया चव्हाण व प्राजक्ता जाधव या जोडीने सुवर्णपदकाला गवसणी घातली, या पदकाने महाराष्ट्राचे सुवर्णपदकाचे खाते उघडले. 555 गुणांची कमाई करीत रिया-प्राजक्ता जोडीने गंडा प्रकारात सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन घडवले. मणिपूरने 552 गुणांसह रौप्य, तर कर्नाटकने 542 गुणांसह कांस्यपदकांवर नाव कोरले. एकेरीत महाराष्ट्राच्या किर्णाक्षी येवलेने कांस्यपदकाची कमाई केली आहे.

कबडडीत महाराष्ट्राची विजयी सलामी

बीच सेपक टकरा स्पर्धेतील दुसऱ्या लढतीत महाराष्ट्राला विजय गवसला. महाराष्ट्राने राजस्थानला 2-0 असे सरळ सेटमध्ये पराभूत करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. कब•ाr मैदानातही महाराष्ट्राचा जयजयकार घुमला. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी यजमान दीव दमणला पराभूत केले. महिला संघाने दीव संघाचा 80-11 गुणांनी धुव्वा उडविला, तर पुरुष संघाने दीव संघावर 73-36 गुणांनी दणदणीत विजय संपादन केला. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 5 कांस्य पदके जिंकून महाराष्ट्र पदकतक्यात तिसऱ्या स्थानावर आहे. यजमान दीव-दमण 3 सुवर्णांसह एकूण 4 पदकांसह अव्वल स्थानी आहे.

Advertisement
Next Article