कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अगरबत्तीचा प्रताप

06:21 AM Nov 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खरे तर अगरबत्ती किंवा उदबत्ती ही एक किरकोळ वस्तू आहे. आपण प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात तिचा उपयोग करत असतो. मुले फटाके वाजविण्यासाठी ती उपयोगात आणतात. कोणत्याही कार्यात भोजनाच्या पंक्तींमध्ये उदबत्त्या लावल्या जात. आता ‘पंक्ती’ किंवा पंगत हा प्रकार कमी झाल्याने उदबत्त्यांचा तो उपयोग पुष्कळसा थांबला आहे. ही वस्तू धांदरटपणे हाताळली तर काहीवेळा आपल्याला तिचा चटका बसू शकतो. पण एकंदरित ही निरुपद्रवी वस्तू मानली जाते.

Advertisement

तथापि, चीनमध्ये एक अशी घटना घडली आहे, की ही अगरबत्ती चुकीच्या पद्धतीने हाताळल्यास किंवा पेटविल्यास किती मोठा उत्पात घडू शकतो, याचा परिचय झाला आहे. चीनच्या जिआंगसू या प्रांतातील फेगुआंग नामक डोंगरावर एक हजार वर्षांपूर्वी बांधलेले एक पुरातन मंदिर आहे. हे मंदिर ‘वेनचांग’ मंदिर म्हणून ओळखले जाते. याची रचना पूर्णपणे लाकडी आहे. ते पाहण्यासाठी प्रत्येक वर्षी असंख्य पर्यटक येतात. काही दिवसांपूर्वी एका पर्यटकाने या मंदिरात पूजा करण्यासाठी मेणबत्तीवर अगरबत्ती पेटविण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत पेटती मेणबत्ती खाली पडली आणि हे मंदिर पूर्णपणे लाकडाचे असल्याने भूमीवरील लाकडी आच्छादनाने पेट घेतला. यावेळी मंदिरात उपस्थिती अतिशय कमी होती. त्यामुळे झालेला प्रकार लोकांच्या लवकर लक्षात आला नाही. नंतर पाहता पाहता ही मेणबत्तीने लागलेली आग भडकली आणि ती विझविण्यासाठी प्रयत्नांचा प्रारंभ होण्याच्या आतच ती छतापर्यंत पोहचून छत कोसळले. त्यामुळे आग आणखीनच भडकली आणि काही तासांमध्येच हे मंदिर पूर्णपणे भस्मसात झाले. एक फार मोठा आणि महत्वाचा ऐतिहासीक ठेवा या मंदिराच्या रुपात होता. त्याची आता राख झाली आहे. वेनचांग याचा अर्थ ज्ञान आणि साहित्य यांची देवता असा आहे. आपल्याकडे देवी सरस्वतीचे जे स्थान आहे, तेच या देवतेचे चीनमध्ये आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article