कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहापूर बेळगावच्या सराफी व्यवसायाचा गौरवशाली वारसा

10:47 AM Oct 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उत्कृष्ट कारागिरी, दागिन्यांची शुद्धता यासाठी कोकण, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये प्रसिद्ध : पारदर्शकता, ग्राहकांचा विश्वास अन् आपुलकीचा सुवर्णबंध जपण्यावर भर

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहराचा 200 वर्षांहून अधिक जुना असलेला सोन्या-चांदीचा व्यवसाय हा गौरवशाली वारसा जपत आहे. हा व्यवसाय एकेकाळी शहापूर भागातून सुरू झाला आणि उत्कृष्ट कारागिरी, दागिन्यांची शुद्धता यासाठी संपूर्ण कोकण, महाराष्ट्र (सांगली, कोल्हापूर) आणि कर्नाटक (धारवाड) मध्ये प्रसिद्ध झाला. 1850 ते 1900 या काळात बेळगाव हे सोन्या-चांदीच्या व्यापाराचे मोठे केंद्र बनले होते. तोडे, पाटली, कंठी, कोल्हापुरी साज आणि कंबरपट्टा यासारख्या विशिष्ट नक्षीकामाच्या दागिन्यांना खूप मागणी होती.

Advertisement

विश्वासार्ह बाजारपेठ

शहरातील सराफी बाजारपेठ आपल्या सोन्याच्या शुद्धतेसाठी खूप नावाजलेली होती. लांबून आलेले व्यापारी चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी घोडागाडी आणि बैलगाडीने येत असत.

पारंपरिक कौशल्य

पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या या व्यवसायात स्थानिक कारागिरांचे कौशल्य सर्वोच्च दर्जाचे होते. ‘गोल्ड कंट्रोल अॅक्ट’सारखी आव्हाने पेलूनही, बेळगावच्या सुवर्णकारांनी आपला व्यवसाय टिकविला आणि विस्तारला. आज या व्यवसायात आधुनिकीकरण आले असून सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री वापरली जाते, ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढला आहे. पूर्वीच्या स्थानिक कारागिरांसोबत आता बंगालसह इतर राज्यातील कुशल सुवर्ण कारागीर बेळगावात येऊन नवीन कला आणि तंत्र आणत आहेत.

बेळगावातील प्रतिष्ठित सराफी दुकाने

शहापूर सराफ कट्टा येथे अनेक प्रतिष्ठित दुकाने पिढ्यान्पिढ्या व्यवसायाची परंपरा चालवत आहेत. जुन्या पिढीतील उच्चशिक्षण घेतलेली मुले परदेशात स्थायिक होत असली तरी इतर राज्यातील कुशल व्यावसायिकांमुळे बेळगावच्या सराफी व्यवसायाचा विस्तार होत आहे आणि त्याला नवीन ऊर्जा मिळत आहे. बेळगावचा सोन्या-चांदीचा व्यवसाय हा जुन्या परंपरा आणि नवीन युगातील गरजा यांचा समन्वय साधत आहे. आव्हाने असली तरी नवीन पिढीने आधुनिक ज्ञान आणि बाहेरील कारागिरांनी आणलेली कला यामुळे या व्यवसायाची पाळेमुळे अधिक घट्ट होत आहेत, ज्यामुळे भविष्यात बेळगावची सराफी बाजारपेठ पुन्हा एकदा आपला गौरवशाली दबदबा निर्माण करेल, यात शंका नाही.

एम. आर. हेरेकर अँड सन्स

शहापूर सराफ कट्टा येथील एम. आर. हेरेकर अँड सन्स हे सुप्रसिद्ध आणि प्रतिष्ठित सराफी दुकान आहे. या दुकानाची स्थापना सन 1967 मध्ये झाली. सुरुवातीला हा व्यवसाय दिवंगत कै. मनोहर रघुनाथ हेरेकर (वडील) पाहत होते. त्यांच्या पश्चात आता त्यांचे चिरंजीव रमेश हेरेकर आणि अभिजीत हेरेकर हे दोघे हा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत आहेत. यांच्या दुकानात शुद्ध सोन्या-चांदीचे नाविन्यपूर्ण दागिने उपलब्ध असून ग्राहकांच्या मागणीनुसार (ऑर्डरप्रमाणे) ते बनवूनही मिळतात. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातून असंख्य ग्राहक खास खरेदीसाठी येथे येतात. ‘ग्राहकांचा विश्वास हाच आमच्या यशाचा आधार आहे’, असे हेरेकर बंधूंनी सांगितले.

आर. एस. हेरेकर ज्वेलर्स (राघव हेरेकर)

शहापूर सराफ कट्टा येथील आर. एस. हेरेकर ज्वेलर्स हे नेहमी ग्राहकांनी गजबजलेले दुकान आहे. या दुकानाची स्थापना सन 1970 मध्ये करण्यात आली होती. या व्यवसायाची सुरुवात त्यांचे वडील कै. सदानंद रघुनाथ हेरेकर यांनी केली होती. सध्या त्यांचे चिरंजीव राघव हेरेकर हे हा व्यवसाय समर्थपणे सांभाळत आहेत. आर. एस. हेरेकर ज्वेलर्समध्ये शुद्ध सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने तसेच चांदीचे पूजेचे साहित्य आणि विविध गिफ्ट वस्तू उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या सोयीसाठी दागिने व सर्व साहित्य एसी (वातानुकूलित) सोय असलेल्या सुसज्ज शोरुममध्ये ठेवण्यात आले आहे. गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यातून मोठ्या संख्येने ग्राहक या दालनामध्ये खरेदीसाठी येतात.

बी. आर. हेरेकर ज्वेलर्स (निलेश हेरेकर)

शहापूर सराफ कट्टा येथील सराफी व्यवसायात हेरेकर कुटुंबीयांनी अव्याहतपणे सुरू ठेवलेला सुवर्णव्यवसाय स्पष्टपणे दिसून येतो. यातीलच एक महत्त्वाचे आणि अग्रगण्य नाव म्हणजे बी. आर. हेरेकर ज्वेलर्स हे होय. या प्रतिष्ठित दुकानाची स्थापना 59 वर्षांपूर्वी बंडोपंत रघुनाथ हेरेकर यांनी केली होती. सध्या त्यांचे चिरंजीव निलेश बंडोपंत हेरेकर हे त्यांच्यासोबत हा व्यवसाय समर्थपणे सांभाळत आहेत. निलेश यांना त्यांची पत्नी नेहा यासुद्धा व्यवसायात सक्रियपणे हातभार लावत आहेत. यांच्या दुकानात शुद्ध सोने, बीआयएस आणि हॉलमार्क असलेले दागिने, तसेच चांदीचे दागिने व पूजेचे साहित्य उत्तम दर्जा आणि शुद्धतेच्या प्रमाणित प्रमाणानुसार उपलब्ध आहे. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तिन्ही राज्यातून ग्राहक मोठ्या संख्येने आणि विश्वासाने येथे खरेदीसाठी येतात.

आर. ए. हेरेकर ज्वेलर्स (राहुल हेरेकर)

सराफी व्यवसाय हा सोन्यासारखा शुद्ध आणि विनम्र भावनेने करायला हवा, या उदात्त हेतूने सराफी व्यवसायाचा गाढा अनुभव असलेले अरुण हेरेकर व त्यांचे चिरंजीव राहुल हेरेकर यांनी ग्राहकांचा कल ओळखून आर. ए. हेरेकर ज्वेलर्सची अद्ययावत आणि सर्व सोयींनीयुक्त स्थापना पाच वर्षांपूर्वी केली. या दालनात सोने व चांदीचे दागिने तयार स्वरुपात तसेच ऑर्डरप्रमाणे बनवून मिळतात. आता या व्यवसायात राहुल हेरेकर यांना त्यांची पत्नी तृप्ती यासुद्धा नियमितपणे सक्रिय साथ देत असतात. हेरेकर कुटुंबीयांच्या विनम्र सेवाभावामुळे आणि आपलेपणामुळे अल्पावधीतच गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातून ग्राहकांचा ओघ या सुवर्णपेढीकडे लक्षणीयरीत्या वाढताना दिसत आहे.

मे. ए. बी. भोसले ज्वेलर्स (वसंत भोसले)

शहापूर खडेबाजार येथील सुप्रसिद्ध सराफी दुकान म्हणून मे. ए. बी. भोसले ज्वेलर्स ओळखले जाते. या दुकानाची स्थापना सन 1930 मध्ये कै. मारुतीराव आनंदराव भोसले यांनी केली. सध्या त्यांचे चिरंजीव वसंत मारुतीराव भोसले आणि नातू आनंद वसंत भोसले हे दोघेही दीर्घकालीन व्यवसायाची परंपरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. यांच्या दुकानात ग्राहकांसाठी 916 हॉलमार्कचे शुद्ध सोन्याचे दागिने तसेच चांदीचे पूजा साहित्य आणि विविध आभूषणे (दागिने) उपलब्ध आहेत.

मे. वासुदेव आर. हेरेकर ज्वेलर्स(प्रशांत हेरेकर)

शहापूर, खडेबाजार येथील मे. वासुदेव आर. हेरेकर ज्वेलर्स या सराफी दुकानाला मोठी पूर्वापार परंपरा लाभलेली असून, संचालक प्रशांत हेरेकर व त्यांचे बंधू नितीन हेरेकर हे सध्या हा व्यवसाय यशस्वीरीत्या सांभाळत आहेत. महिलावर्गाला दागिन्यांबाबत विशेष मार्गदर्शन करणे, तसेच नवनवीन संकल्पना (कल्पना) सुचविण्याचे काम प्रशांत हेरेकर व त्यांची पत्नी प्रेरणा सक्रियपणे करत आहेत. पारदर्शक व्यवसाय, ग्राहकांचा विश्वास आणि आपुलकीचा सुवर्णबंध (सोन्यासारखे नाते) जपण्यावर यांचा विशेष भर असतो. या सुवर्णदालनात सोन्या-चांदीचे दागिने तयार स्वरुपात, तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार (ऑर्डरप्रमाणे) बनवून मिळतात.

डी. के. हेरेकर ज्वेलर्सच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त बंपर ऑफर!

खडेबाजार, बेळगाव येथील प्रसिद्ध डी. के. हेरेकर ज्वेलर्स आपल्या सुवर्ण दालनाच्या पहिल्या वर्धापनदिन आणि दसरा-दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी खास बंपर ऑफर घेऊन आले आहेत. ही आकर्षक योजना 22 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीसाठी मर्यादित आहे. या ऑफर अंतर्गत सोने व चांदीची खरेदी करून ग्राहकांना कूपन्स मिळतील आणि त्यातून स्कूटर, 55 इंच, 43 इंच आणि 32 इंची स्मार्ट टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, टॅब, ओव्हन, मिक्सर, फॅन, इस्त्राr यासारखी बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल. लकी ड्रॉ चा भव्य सोहळा रविवार दि. 16 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. ही ऑफर खडेबाजारातील श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ तसेच तेली पाटील गल्ली, शहापूर येथील शाखेत उपलब्ध आहे. ग्राहकांनी लवकरात लवकर भेट देऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी दुकानात संपर्क साधावा, नियम व अटी लागू राहतील. सणासुदीच्या खरेदीसोबत आता बक्षिसे जिंकण्याचीही दुहेरी संधी डी. के. हेरेकर ज्वेलर्स देत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article