जागतिक स्तरावर शस्त्रास्त्रस्पर्धा तीव्र
पहिल्यांदाच एक अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक विक्री
वृत्तसंस्था/ स्टॉकहोम
जगातील अनेक हिस्स्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे शस्त्रास्त्रविक्रीची चढाओढ तीव्र झाली आहे. युक्रेन आणि गाझामधील युद्धा आणि आशियातील तणावामुळे प्रमुख शस्त्रास्त्र उत्पादकांच्या विक्रीत वृद्धी झाली आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टीट्यूटच्या अहवालानुसार जगातील 100 सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र कंपन्यांची विक्री 2023 मध्ये 4.2 टक्क्यांनी वाढून 632 बिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे.
अहवालानुसार 2022 मध्ये शस्त्रनिर्मितीशी निगडित उत्पन्नात घट दिसून आली होती, कारण शस्त्रास्त्रउत्पादक मागणीतील वृद्धी पूर्ण करण्यासाठी झगडत होते, परंतु मागील वर्षी यातील अनेक कंपन्या उत्पान वाढविण्यास यशस्वी ठरल्या आहेत. 100 कंपन्यांनी मागील वर्षी पहिल्यांदाच एक अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकची विक्री प्राप्त केली आहे.
शस्त्रास्त्रांची चढाओढ आणखी वाढणार
सैन्य खर्च आणि शस्त्रास्त्र उत्पादनाचे संशोधक लोरेंजो स्काराजाटो यांनी 2023 मध्ये शस्त्रास्त्र उत्पादकांच्या महसुलात उल्लेखनीय वाढ झाली होती आणि 2024 मध्ये देखील ही जारी राहण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. जगातील आघाडीच्या 100 शस्त्रास्त्र कंपन्यांची विक्री अद्याप मागणीच्या निकषाला पूर्णपणे प्रतिबिंबित करत नाही. कनेक कंपन्यांनी भरती अभियान सुरू केले आहे. यामुळे त्यांची भविष्यातील विक्री वाढणार असल्याचे स्पष्ट होते. गाझा आणि युक्रेनमधील युद्ध, पूर्व आशियातील वाढता तणाव तसेच अन्य क्षेत्रांमध्ये शस्त्राrकरण कार्यक्रमांशी निगडित मागणी पूर्ण करण्यात छोटे उत्पादक अधिक प्रभावी राहिले असल्याचे स्काराजाटो यांनी म्हटले आहे.
अमेरिकन कंपन्यांची आघाडी
अमेरिकन कंपन्यांनी मागील वर्षी स्वत:च्या विक्रीत 2.5 टक्क्यांची वृद्धी नोंदविली आहे. हे प्रमाण जागतिक शस्त्रास्त्रविक्रीच्या निम्मे आहे, जगातील आघाडीच्या 100 पैकी 41 शस्त्रास्त्र उत्पादक अमेरिकन कंपन्या आहेत. दुसरीकडे सर्वात मोठे शस्त्रास्त्र उत्पादक असलेल्या लॉकहीड मार्टिन आणि आरटीएक्सने अनुक्रमे 1.6 टक्के आणि 1.3 टक्क्यांची महसुली घट नोंदविली आहे. मानांकनात दोन रशियन समुहांच्या शस्त्रास्त्रविक्रीत 40 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. याचे मुख्य कारण रोस्टेकच्या विक्रीत झालेली 49 टक्क्यांची वृद्धी आहे. इस्रायलच्या तीन कंपन्यांनी 13.6 अब्ज डॉलर्सची विक्री नोंदविली आहे. पूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 15 टक्क्यांनी अधिक आहे. तुर्कियेतील तीन कंपन्यांच्या विक्रीतही 24 टक्क्यांची वाढ झाली आहे.