महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुलीची छेडछाड, डॉक्टरला बेदम चोप

11:49 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हुक्केरीतील घटना : रुग्णालयाची मोडतोड : डॉक्टरवर कारवाईची मागणी

Advertisement

वार्ताहर/हुक्केरी

Advertisement

आरोग्याची तक्रार घेऊन आलेल्या 17 ते 18 वर्षे वयोगटातील मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी सुरक्षा इस्पितळाचे डॉ. मुत्तूराज हुग्गार यांना मुलीच्या नातेवाईकांनी बेदम चोप देण्यासह इस्पितळातील फर्निचरची तोडफोड केली. या घटनेची फिर्याद हुक्केरी पोलीस ठाण्यात नोंदवून सदर डॉक्टरावर कडक कारवाई करण्यासह त्याचा वैद्यकीय परवाना रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली. या घटनेसंदर्भात समजलेली माहिती अशी, ग्रामीण भागातील 17 ते 18 वर्षे वयोगटातील मुलगी आजारी असल्यामुळे उपचार घेण्यासाठी सुरक्षा इस्पितळात आली असता डॉ. मुत्तूराज हुग्गार यांनी सदर मुलीला तपासणी कक्षात घेऊन जाऊन तिची छेड काढली.

सदर मुलीने या घटनेविषयीचा वृत्तांत सायंकाळी घरी पोहोचल्यानंतर पालकांना दिला. याची दखल घेत नातेवाईक व काही गावकऱ्यांनी सुरक्षा इस्पितळ गाठून डॉक्टरास जाब विचारत बेदम चोप देण्यासह इस्पितळाची तोडफोड केली. सदर डॉक्टरवर कारवाई करावी व त्याचा परवाना रद्द करावा, अशी मागणी हुक्केरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत केली आहे. पोलीस निरीक्षक महांतेश बसापुरे यांनी याची दखल घेत तातडीने सदर डॉक्टरास ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्या मुलीच्या पालकांना दिले आहे. या घटनेने हुक्केरी शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली असून तो चर्चेचा विषय ठरला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article