For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विषप्रयोग करत मुलीने घेतला 13 जणांचा जीव

06:42 AM Oct 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
विषप्रयोग करत मुलीने घेतला 13 जणांचा जीव
Advertisement

विवाह करू देण्यास नकार दिल्याने उचलले पाऊल

Advertisement

वृत्तसंस्था/ कराची

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका मुलीने भोजनात विष मिसळवून स्वत:च्या कुटुंबातील 13 जणांना ठार केले आहे. मुलीच्या पसंतीनुसार तिचे कुटुंबीय विवाह करवून देण्यास तयार नव्हते. यामुळे संतापलेल्या मुलीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. कुटुंबातील 13 जणांचा मृत्यू खैरपूरनजीक हैबत खात ब्रोही गावात झाला आहे. मुलीने स्वत:च्या प्रियकरासोबत मिळून अन्नात विष मिसळण्याचा कट रचला होता.

Advertisement

जेवल्यावर कुटुंबातील 13 जणांची प्रकृती बिघडली होती. त्यांना  रुग्णालयात हलविण्यात आले होते, जेथे या सर्वांचा मृत्यू झाला होता. उत्तरीय तपासणी केली असता त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचे उघडकीस आले होते अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी इनायत शाह यांनी दिली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास केला असता मुलीने आणि तिच्या प्रियकराने घरातील गव्हात विष मिसळले होते असे समोर आले. पोलिसांनी या मुलीला अटक केली असून तिने प्रियकराच्या मदतीने विषप्रयोग केल्याची कबुली दिली आहे.

Advertisement
Tags :

.