महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युवतीला पाण्याचीच अॅलर्जी

06:33 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्पर्श होताच बिघडते प्रकृती

Advertisement

जगात अनेक प्रकारचे लोक असून त्यांना विचित्र शारीरिक समस्या आहेत. यातील काही समस्यांवर सोप्या पद्धतीने मात करता येते. तर काही जणांच्या समस्या इतक्या विक्राळ असतात की, त्यांचे दैनंदिन जीवनच हलाखीचे होऊन जाते. काहीशी अशीच समस्या एबी नावाच्या युवतीला आहे. एबीला पाण्याचीच अॅलर्जी आहे. ही युवती पाणी पिऊ शकते, परंतु त्याला स्पर्श करू शकत नाही.

Advertisement

माणसासाठी पाणी आणि हवा आवश्यक असल्याचे बोलले जाते, परंतु यातील एका गोष्टीच अॅलर्जी झाल्यास जगणं किती अवघड होऊन बसेल याची कल्पना करा. एबी नावाच्या युवतीने साधारण पाण्याची अॅलर्जी असल्याचे सांगितले आहे. पाण्याचा स्पर्श होताच ती तडफडू लागते.

एबीला पाण्यापासून अजब अॅलर्जी आहे. ती पाणी पिऊ शकते, परंतु पाण्यात जाऊ शकत नाही. पाण्याच्या संपर्कात येताच तिच्या त्वचेवर भयंकर रिअॅक्शन होते. पाणी पडताच तिच्या त्वचेवर सूज, खाज, फोड आणि जळजळ होण्यास सुरुवात होते. हा प्रकार अत्यंत वेदनादायी असतो, ती आठवड्यात केवळ एकाच स्नान करते.  ते देखील अत्यंत जलदपणे तिला उरकावे लागते. काही वेळ पाण्यात राहिल्यावर तिच्या समस्या वाढू लागतात.

काय आहे आजार?

एबीला एक्वाजेनिक अर्टिकारिया नावाची एक कंडिशन असून यात शरीरावर पाणी पडताच रिअॅक्शन सुरु हेते. हा काही सामान्य आजार नाही. पूर्ण जगात 20 कोटी लोकांमध्ये केवळ एकालाच हा अजब आजार होत असतो. वयाच्या 16  व्या वर्षी एबीला या अॅलर्जीविषयी प्रथम कळले हेते, प्रारंभी तिला याचा स्वीकार करणेच अवघड ठरले हेते. परंतु नंतर तिने या स्थितीसोबत जगणे शिकून घेतले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article