महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रत्येक गोष्टीपासून युवतीला अॅलर्जी

06:11 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

10 मिनिटात होते बिकट अवस्था

Advertisement

मानवाच्या आयुष्यात बरेच असे काही असते, ज्याविषयी त्यालाच माहित नसते. शरीराला सर्वाधिक गुंतागुंत असणारी गोष्ट मानले जाते, यामागील कारण म्हणजे शरीरातील कार्यरचना आहे. अनेकदा शरीरात नेमके काय घडतेय हेच आपल्याला कळत नाही. असाच प्रकार एका युवतीसोबत घडला आहे. ही युवती दरदिनी भयानक अॅलर्जीने पीडित व्हायची. स्वत:च्या खऱ्या अवस्थेबद्दल कळल्यावर तिला धक्काच बसला.

Advertisement

दक्षिण कोरियातील कंटेंट क्रिएटर जोआनी फॅनने स्वत:च्या अजब स्थितींविषयी माहिती दिली आहे. तिला अनेक गोष्टींपासून अॅलर्जी असल्याने आता मरण्यासाठी सुमारे 37 पद्धती असल्याचे ती सांगते. या अॅलर्जीसंबंधी ती काहीच करू शकत नाही. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तिने स्वत:ची व्यथा मांडली आहे.

जोआनी फॅनचे वय 21 वर्षे असून तिला वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची आवड आहे. सोशल मीडियावर तिचे असंख्य फॉलोअर्स आहेत. जोआनी या अॅलर्जींसोबतच लहानाची मोठी झाली आहे. तिला सर्वप्रकारच्या सुक्या मेव्यांपासून अॅलर्जी आहे. तसेच तिला सर्व सीफूड्स खाल्ल्यावरही अॅलर्जी होते. 37 हून अधिक खाद्यपदार्थांची तिला अॅलर्जी असून त्यांच्यामुळे ती 10 मिनिटांत अत्यवस्थ होत असते.

जोआनी स्वत:च्या स्थितीची थट्टा करत आपल्याकडे मरण्यासाठी अनेक मार्ग असल्याचे सांगते. या अॅलर्जींवरून मी कधीच ताण घेत नाही. तिला एग्जीमा देखील आहे, याच्यामुळे तिची स्थिती अधिकच बिकट होते. तिचे पूर्ण शरीर लाल-लाल होत जळजळ सुरू होते. जोआनीला आता या अवस्थेची सवय झाल्याने अनेकदा ती अशाप्रकारचे खाद्यपदार्थ खाणे टाळत नाही आणि औषधे घेते. परंतु डॉक्टर गंभीर अॅलर्जीयुक्त खाद्यपदार्थ टाळणेच उत्तम असल्याचे तिला सांगत असतात.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social_media
Next Article