For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन फूट केसांची भेट

06:22 AM Jan 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोन फूट केसांची भेट
Advertisement

प्रेमात पडलेले लोक आपल्या प्रेमपात्रांना कोणत्या प्रकारच्या भेटवस्तू देतील याचा काही भरवसा देता येणार नाही, अशी स्थिती असते. आपल्या प्रेमपात्राला खूष करण्यासाठी असे लोक अनेकदा अद्भूत अशी शक्कल लढवितात. नवनव्या कल्पना आचरणात आणतात. त्यातून अनेक परंपरांचाही प्रारंभ होऊ शकतो.

Advertisement

अमेरिकेतील मिशिगन प्रांतातील एक 27 वर्षीय युवती हॅना हॉस्किंग हिच्यावर कोडी एनिस नावाच्या 31 वर्षांच्या युवकाचे प्रेम जडले. कोडीने जेव्हा हॅनाला प्रथम पाहिले तेव्हा तिच्या डोक्यावर एकही केस नव्हता. हे पाहून कोडी आला एक भन्नाट कल्पना सुचली. त्याने सलग चार वर्षे आपल्या डोक्यावरचे केस वाढविले. या चार वर्षांमध्ये त्याने आपल्या केसांची चांगली निगा राखली पण ते मुळीच कापले नाहीत. चार वर्षांनंतर त्याचे केस चांगले दोन फूट वाढले.

नंतर एक दिवस त्याने सगळे केस कापून घेतले. तो स्वत: पूर्णपणे केशविहीन झाला. आपल्या केसांचा एक विग करुन त्याने आपली प्रेयसी हॅना हिला भेट दिला. तो असे काही करेल याची तिला अजिबात कल्पना नव्हती. तो पर्यंत तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. पण त्याने आपल्या केसांचा विग करुन आपल्याला भेट दिला आहे, हे तिला समजले. पण मधल्या काळात एक घटना घडली होती. हॅनाचे अन्य पुरुषाशी लग्न झाले होते. पण आता तिच्या पतीशी इच्छा अशी आहे, हॅनाने तिच्यासाठी केस वाढविणाऱ्या कोडीशीच लग्न करावे. यासाठी तिचा पती तिला विवाहबंधनातून मोकळे करण्यासही तयार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.