For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जुन्या सरकारची कार्यपद्धती देशाला मागे नेणारी

06:45 AM Sep 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
जुन्या सरकारची कार्यपद्धती देशाला मागे नेणारी
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर निशाणा: पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे  लोकार्पण 

Advertisement

पुणे : प्रतिनिधी

 जुन्या सरकराची कार्यपद्धती देशाला मागे घेऊन जाणारी होती. ती कार्यपद्धती आम्ही ती बदलून देशाला वेगाने पुढे घेऊन जात आहोत, असे  म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी विरोधकांवर निशाणा साधला. गणेश कला क्रीडा मंदिरात दूरदृश्य प्रणालीमार्फत पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे लोकार्पण कात्रज ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन तसेच भिडे वाड्यातील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने मोदींच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, छगन भुजबळ, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

Advertisement

मोदी म्हणाले, महिलांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही. म्हणून आम्ही महिलांना पुढे आणण्यासाठी वेगवेगळेया प्रकारे प्रयत्न करत आहोत. विकासाबरोबर वारसाही जपणायचा आमचा प्रयत्न असल्याने सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आज केले आहे.  पुणे ज्या गतीने पुढे जात आहे, त्याच गतीने सर्व सोयी सुविधा वाढल्या पाहिजे या दृष्टीने प्रयत्न केले गेले पाहिजे. आता सुरु झालेला पुण्याचा विकास खूप आधी होणे अपेक्षित होत पण तसे झाले नाही. कोणत्याही योजनेची अंमलबजावणी केली जात नव्हती. त्याची फाईल तयार झाली तरी धूळखात पडून होती. 2008 साली मेट्रोची चर्चा सुरु झाली. पण आमच्या सरकारच्या काळात मेट्रो प्रत्यक्षपणे धावण्यास सुरुवात झाली.  जुनं सरकार 8 वर्षात एका एक पिलर उभारू शकले नाहीत. आमच्या महायुती सरकारने पुण्यात मेट्रो आणली. महाराष्ट्र हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार चांगले काम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

हिरवा झेंडा दाखवून मेट्रो सुरु

पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्गाचे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आलं. आजपासून ही भूमिगत मेट्रो सुरु होणार आहे. नागरिकांनी आवर्जून हा मेट्रो प्रवास करावा असे मेट्रो प्रशासनाने आवाहन केले आहे.

महायुतीने पुण्यात मेट्रो आणली : मुख्यमंत्री शिंदे

शिंदे म्हणाले,  पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्याचे ट्राफिक खूप वाढले आहे. ट्राफिक कमी करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. ट्राफिकमुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येऊन प्रदूषण वाढतय ते कमी करण्यासाठी महायुतीने पुण्यात मेट्रो आणली.

उद्घाटन गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी होणार होता. मोदी जी संवेदनशील मनाचे आहेत. पण जेव्हा सकाळी चर्चा केली पण पुणेकरांना त्रास होऊ नये या गोष्टी पंतप्रधान यांनी लक्षात घेल्या. संवेदनशील पंतप्रधान कसा असतो हे त्यांनी दाखवलं. उद्घाटन केलं असतं तर म्हणले असते लोकांना त्रास देऊन केलं इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं. विरोधक बदलापूर मध्ये आरोपीला फाशी द्या फाशी द्या म्हणले. आरोपी फायर करतो तेव्हा पोलीस शोपिस धरणार का? ते केलं नसतं तर म्हणणार बंदूक शोपीस साठी आहे का? इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं, दोन्ही बाजूने बोलण्रायाना काय म्हणतात? अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे.

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार

विरोधक लाडक्या बहिण योजनेत खोडा घालतात. पण माझ्या बहिणी त्यांना जोडे दाखवतील. लाडक्या बहिणींनो तुम्ही निश्चिन्त राहा. ही योजना कायम सुरु राहणार आहे. निवडणूक डोळ्यसमोर ठेवून आम्ही ही योजना केलेली नाही, असेही मंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पुण्याच्या कणाकणात राष्ट्रभक्ती

पुण्याच्या कणाकणात राष्ट्रभक्ती, समाजभक्ती आहे. मी दोन दिवसापूर्वी पावसामुळे पुण्यात येऊ शकलो नाही. पुण्याच्या पावनभूमीला माझा स्प्रश्य न झाल्याने मी स्वत?चे नुकसान झाल्याचे समजत आहे. पण आज मेट्रोचे ऑनलाईन उदघाटन होत आहे याचा मला खूप आनंद आहे. पुण्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढायला हवी असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Tags :

.