Sangli : कारागृहातील न्यायालयीन बंदी पळून गेल्याचा चौघा पोलिसांवर ठपका !
कारागृहातील पोलिसांच्या दुर्लक्षामुळे आरोपी भोसले पळाला
सांगली : जिल्हा कारागृहातील न्यायालयीन बंदी असलेल्या खुनातील आरोपी अजय दाविद भोसले (वय ३५, रा. मिरज) याच्या पलायनप्रकरणी कारागृहातील चौघा पोलिसांवर ठपका ठेवण्यात आला आहे.
पलायनाचा अहवाल वरिष्ठ अधिकायांना पाठविण्यात आला आहे.त्यामुळे चौघा पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. मिरजेतील कुणाल वाली याच्या खुनातील संशयित अजय भोसलेहा जिल्हा कारागृहात न्यायालयीन बंदी होता. गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कारागृहातील पोलिस कर्मचारी हणमंत पाटणकर, सुभेदार जयवंत रामचंद्र शिंदे, सुभेदार सूर्यकांत पांडुरंग पाटील यांनी संशयित अजय भोसले याला बराकीतून बाहेर काढले होते.
दक्षिणेकडील तटबंदीजवळ साफसफाई करून घेत होते. तेव्हा दोन तटबंदीच्या मोकळ्या जागेत वाढलेल्या गवतातून भोसले पळाला. त्यानंतर, पूर्वेकडील बाजूला पडलेल्या तटबंदीवरून खंदकात उडी घेत पलायन केल्याचाप्रकार घडला. यामुळे कारागृह प्रशासनाची तारांबळ उडाली. तत्काळ कारागृह पोलिस आणि सांगली शहर पोलिसांनी शोधमोहीम राबवली. शनिवारी सायंकाळपर्यंत तो सापडला नव्हता.
दरम्यान, आरोपी भोसले याच्या पलायनप्रकरणी कारागृहाच्या वरिष्ठ अधिकायांनी चौघा पोलिस कर्मचायांविरुद्ध ठपका ठेवला आहे. त्यांच्याविरुद्धचा अहवाल वरिष्ठ अधिकायांना पाठविला आहे. त्यामुळे चौघांवर निलंबनाची टांगती तलवार आहे.