महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सापडलेला मोबाईल केला पोलिसांच्या हवाली

11:09 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
featuredImage featuredImage
Advertisement

बेळगाव : फूल मार्केट परिसरात आढळलेला मोबाईल फेसबुक फ्रेंड सर्कलच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधितांना परत केल्याची घटना रविवारी घडली. या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे. फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर व दिनेश कोल्हापुरे यांना रविवारी सकाळी फूल मार्केट परिसरात विवो कंपनीचा एक मोबाईल आढळला. लगेच त्यांनी तो मार्केट पोलीस स्थानकात नेऊन सकाळी सेवेत असलेले हवालदार एस. एस. भद्रशेट्टी यांच्याकडे सुपूर्द केला. मोबाईल स्क्रीन लॉक असल्याने तो कोणाचा, याचा शोध घेणे सुरुवातीला कठीण गेले. त्याच मोबाईलवर आलेल्या फोन कॉलवरून मूळ मालकाचा शोध लागला. तो शहाबाज नामक गृहस्थाचा असल्याचा आढळून आले. मार्केट पोलिसांनी संबंधितांना तो परत केला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia