कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Solapur | आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावा : कृषिमंत्री दत्तामामा भरणे

05:48 PM Oct 24, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

 अजित पवारच खरे कणखर नेते" :  कृषीमंत्री दत्तामामा भरणे

Advertisement

टेंभुर्णी : आपला पक्ष शाहू, फुले व आंबेकरांच्या विचार धारेवर चालणारा आहे. जो चुकीचे वक्तव्य करतो त्यास परखडपणे उत्तर देणारा कणखर नेता अजित पवार हेच आहेत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावा, असे आवाहन कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांनी केले.

Advertisement

माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नगोर्ली (टेंभुर्णी) येथील फार्म हाऊस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी आमदार संजयमामा शिंदे, जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे, शिवाजी कांबळे व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कृषीमंत्री भरणे म्हणाले, थोड्या दिवसात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होतील. अजित पवार यांनी सर्वात जास्त मदत सोलापूर जिल्ह्याला केली आहे. यामुळे लोकांच्या अडीअडचणी समजून घ्या. सतत लोकांमध्ये जावा, त्यांच्यात मिसळा. शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या मिळवून देण्यासाठी मदत केली पाहिजे. सरकार करेल म्हणून वाट पाहू नका. स्वतःची ताकद व ओळख निर्माण झाली पाहिजे, असे काम करा, असा विश्वास मंत्री भरणे यांनी कार्यकर्त्यांना दिला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केले.

यावेळी पंढरपूरचे कल्याणराव काळे, यशवंत शिंदे, लतीफ तांबोळी, दादासाहेब साठे, मीनल साठे, रामेश्वर मासाळ, बाळासाहेब बंडगर, उदय माने, सुरेश पालवे, अॅड. नितीन भोसले, वर्षा शिंदे आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#NCPMeeting#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaajit pawarDattatrayBharnesolapur
Next Article