कृत्रिम अवयव मापन प्रक्रियेचा पहिला टप्पा पार
बेळगाव : भारत विकास परिषद, पिंपरी-चिंचवड, दक्षिण पुणे शाखा, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज व रोटरी क्लब वेणुग्राम बेळगाव यांच्यावतीने रविवार दि. 2 रोजी बेळगाव येथील भरतेश एज्युकेशन ट्रस्ट येथे कृत्रिम अवयव मापन प्रक्रियेचा पहिला टप्पा पार पडला. यावेळी 64 लाभार्थींची 68 अवयवांसाठी मापे घेण्यात आली. पहिल्या टप्प्यासाठी 13 जणांचा गट पुणे येथून बेळगावला आला होता. या उपक्रमासाठी रोटरी वेणुग्रामचे अध्यक्ष शशिकांत नाईक, इन्व्हेंट चेअरमन मल्लिकार्जुन मुरगुडे, कुणाल बजाज, इन्व्हेंट मेंटॉर चंद्रकांत राजमाने, कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर डी. बी. पाटील, सचिव लोकेश होंगल, राजेश तळेगाव, प्रसाद कट्टी, ज्योती कोले, उमेश रामगुरवाडी यांच्यासह अनेक सदस्यांचे सहकार्य लाभले. कृत्रिम अवयवांची निर्मिती पुणे येथे होणार असून एक महिन्याच्या कालावधीमध्ये लाभार्थींवर त्यांचे रोपण केले जाईल. या प्रकल्पासाठी एकूण 10 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. बेळगाव येथील उपक्रमासाठी भरतेश एज्युकेशनचे विशेष सहकार्य लाभले.