‘पुन्हा सही रे सही’चा पहिला प्रयोग आज सांखळीत
वामन हरी पेठे ज्वेलर्स पुरस्कृत ‘तरुण भारत’ नाट्या महोत्सवास आजपासून प्रारंभ,पुढील दोन दिवस गोव्यात होणार नाटकाचे प्रयोग
पणजी : वामन हरी पेठे ज्वेलर्स पुरस्कृत आणि लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप सोसायटी लिमिटेडच्या सहकार्याने आयोजित ‘तरुण भारत’ नाट्या महोत्सवाचा प्रारंभ आजपासून होणार आहे. या महोत्सवात हास्यस्फोटक धमाका करणारे भरत जाधव यांची चौरंगी भूमिका असलेले विश्वविक्रमी ‘पुन्हा सही रे सही’ नाटकाचा पहिला प्रयोग शनिवार दि. 15 रोजी रवींद्र भवन सांखळी येथे आज रात्री. 9 वा. होणार आहे. गोव्यात पुढील दोन दिवस ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाचे प्रयोग होणार आहे. रविवार दि. 16 रोजी या नाटकाचा दुसरा प्रयोग मा. दिनानाथ मंगेशकर सभागृह, कला अकादमी पणजी येथे सकाळी 11 वा. होणार आहे तर सोमवार दि. 17 रोजी तिसरा प्रयोग रवींद्र भवन कुडचडे येथे सायं. 7.30 वा. होणार आहे.
भरत जाधव एनटरटेन्मेंट निर्मित ‘पुन्हा सही रे सही’ हे नाटक गेली 20 वर्षे रंगभूमीवर प्रचंड गर्दी खेचण्याचे कार्य करत आहे. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलेले असून, घटनांची विलक्षण मांडणी, सस्पेन्स, विनोदाचा तडका आणि भरत जाधव यांच्या सहज, सुंदर अभिनयाने हे नाटक नाट्यारसिकांच्या पसंतीस उतरले आहे. गोमंतकीय नाट्यारसिकांना हे नाटक पाहण्याची सुवर्ण संधी वामन हरी पेठे ज्वेलर्स, लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप सोसायटी लिमिटेड आणि दै. ‘तऊण भारत’तर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे गोमंतकीय जनतेने या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अभिनेते भरत जाधव यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान, या नाटकाची तिकिटे साखळी, पणजी आणि कुडचडे येथील नाट्यागृहांवर उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे प्रेक्षकांना ऑनलाईन तिकिट ‘तिकिटालय’ या अॅपवर बुक करता येणार आहे. ‘तिकिटालय’ हे संपूर्णत: मराठी कार्यक्रमांच्या तिकिट बुकिंग करण्याचे खास डिजिटल व्यासपीठ आहे. मराठी करमणूक क्षेत्रातील सादर होणाऱ्या मराठी कार्यक्रमांच्या ऑनलाइन बुकिंगसाठी जगभरातील मराठी प्रेक्षक या अॅपद्वारे तिकिटे खरेदी करू शकतात. सांखळी येथे होणाऱ्या प्रयोगांची तिकिटे विनायक पांगम (9767261100) यांच्याकडे उपलब्ध असतील तर कुडचडे येथे होणाऱ्या प्रयोगाची तिकिटे चंद्रकांत नाईक (9850472408) यांच्याकडे उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे या प्रयोगांच्या फोन बुकिंगसाठी (9011036442) या क्रंमाकावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.