नृसिंहवाडीत पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न...'दत्तनामा'च्या गजरात शेकडो भाविकांनी घेतला पवित्र स्नानाचा लाभ
नृसिंहवाडी वार्ताहर
पावसाळ्याला सुरुवात होऊन एक महिन्याहून अधिक काळ उलटला मात्र येथील दत्त मंदिरात दत्त भक्तांना प्रतीक्षा होती ती दक्षिणवर सोहळा पवित्र स्नानाची अखेर मंगळवारी पहाटे 4:15 च्या दरम्यान येथील दत्त मंदिरात कृष्णचे पाणी श्रींच्या चरण कमलावरून उत्तर द्वारातून प्रवेश करून दक्षिण द्वारा बाहेर पडले व दक्षिणेवर सोहळा सुरू झाला. या दक्षिण द्वारासमोर स्नान करणे पवित्र मानले जाते याचा लाभ शेकडोदत्त भक्तांनी घेतला.
शिरोळ तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी कोयना राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे येथील कृष्णा पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत सुमारे गेल्या बारा तासात 15 फुटाणे वाढ झाल्याने येथील दत्त मंदिरात मंगळवारी पहाटे 4:15 च्या दरम्यान या मोसमातील पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला पाणी संत गतीने वाढत होते यामुळे पहाटेपासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत ही स्नानाची महापर्वाणी सुरू राहिली यानंतर पुन्हा काही प्रमाणात पाणी ओसरू लागले यामुळे उतरता दक्षिण द्वार सोहळा ही पार पडला.
पूर आल्यानंतर कृष्णेचे पाणी येथील दत्त मंदिरा च्या उत्तर द्वारातून श्रींच्या चरण कमलावरून दक्षिण द्वारातून बाहेर पडते यालाच दक्षिण द्वार असे संबोधतात यावेळी दक्षिण द्वारासमोर स्नान करणे पवित्र मानले जाते अशी भाविकांची श्रद्धा ही आहे.
दरम्यान सोमवारी सायंकाळीच कृष्णेच्या पुराचे पाणी दत्त मंदिरात प्रवेश केले होते यामुळे सोमवारी रात्रीचा पालखी सोहळा सुमारे अडीच ते तीन फूट पाण्यातूनच पार पडला तेव्हापासूनच दक्षिणेला सोहळ्याची प्रतीक्षा लागून राहिली होती मध्यरात्रीनंतरही फक्त लोक या सोहळ्याचे प्रतीक्षा करत होते मात्र पाण्याची गती साधारणता एक तासाला एक इंच याप्रमाणे वाढत असल्यामुळे ही प्रतीक्षा अखेर पहाटे 4:15 च्या दरम्यान संपली दत्त देव संस्थांमार्फत येणाऱ्या भाविकांना दक्षिण द्वार स्नानाचा लाभ घेता यावा याकरता बॅरॅकेट्स दोरखंड याची व्यवस्था केली होती यामुळे भाविकांना येथे श्रींचे दर्शन घेऊन पवित्र स्थान करता आले यासाठी दत्त देव संस्थांचे अध्यक्ष वैभव पुजारी सचिव सोनू उर्फ संजय पुजारी विश्वस्त आनंद पुजारी पांडुरंग रुके पुजारी यांच्यासह सर्व विश्वस्त तसेच कर्मचारी कार्यात होते यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्वांना स्नानाचा लाभ मिळाला