For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘अग्नि’शामक दलात भ्रष्टाचाराचा ‘अग्नि’!

11:49 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘अग्नि’शामक दलात भ्रष्टाचाराचा ‘अग्नि’
Advertisement

सरकारी इंधन अधिकाऱ्यांच्या खाजगी वाहनांत : विनावापर वाहनांतही रोज भरले जाते इंधन,वाहने बाहेर न पडताही इंधनाची भरमसाट बिले

Advertisement

पणजी : आगीच्या घटना असो किंवा आपत्कालीन प्रसंग, प्रत्येकवेळी तत्परतेने सेवा बजावणाऱ्या अग्निशामक संचालनालयात मात्र भ्रष्टाचाराचा भडका उडाला असून त्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. हा भ्रष्टाचार आताच रोखला नाही, तर या भ्रष्टाचाराच्या भडक्यात संपूर्ण संचालनालयच भस्मसात होण्याची वेळ येऊ शकते. खात्यातील वाहनांमध्ये इंधन भरण्याच्या नावाखाली मोठी लूट सुरू आहे. सरकारी वाहनांसाठीचे इंधन अधिकाऱ्यांच्या खाजगी वाहनांमध्ये जात असल्याचे पुरावे हाती लागले आहेत. हा भ्रष्टाचार, ही लूट एवढी वाढली आहे की प्रत्यक्ष विनावापर पडून असलेल्याही काही वाहनांमध्ये इंधन भरल्याचे कागदोपत्री दर्शवून काही अधिकारी मलई खात असल्याचे उघड झाले आहे. अशाप्रकारे दरमहा सरकारच्या लाखो ऊपयांची लूट करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कायमस्वरुपी बंद वाहनांमध्येही इंधन

Advertisement

या खात्याकडे अनेक वाहने असून त्यापैकी काही वाहने कायस्वऊपी बंद आहेत. अन्य काही वाहने ठराविक वेळेत म्हणजे दिवसाच वापरण्यात येतात. तरीही सदर वाहनांसाठी इंधन मात्र नियमितपणे मोठ्या प्रमाणात भरल्याचे कागदोपत्री दर्शविण्यात येते. त्यासाठीच्या पावत्याही चोखपणे तयार करण्यात येतात. मात्र वाहन चाललेल्या अंतराचे किलोमीटर तपासल्याशिवाय त्या पावत्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळते कशी? असा प्रश्न आहे.

रोजच 30 ते 35 लिटर इंधन

अग्निशामक दलातील प्रत्येक वाहनाला दर महिन्याला ठराविक लिटर इंधन भरण्याची परवानगी आहे. इंधन भरण्यासाठी अनेक सोपस्कर पूर्ण करावे लागतात. आश्चर्यजनक प्रकार म्हणजे काही वाहनांना रोजच प्रत्येकी तब्बल 30 ते 35 लिटर इंधन भरल्याचे कागदोपत्री दर्शविण्यात आले आहे. बऱ्याच वेळा ही वाहने जागेवरुन हललेलीही नसतात, असे स्पष्टपणे दिसून आले आहे.

वरिष्ठांकडून होत नाही खातरजमा

एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधन भरून सदर वाहन कोणत्या कामासाठी वापरण्यात आले? ते किती किलोमीटर अंतर गेले? यापैकी कोणत्याही गोष्टीची खातरजमा वरिष्ठांकडून होत नसल्याचे दिसून आले आहे.

बंद ऊग्णवाहिकेत भरले तब्बल 389 लिटर डिझेल!

अग्निशामक दलाचे बंब, इतर वाहने तसेच आपत्कालीन सेवेसाठी वापरात येणारी यंत्रे यासाठी मोठ्या प्रमाणात पेट्रोल, डिझेलची गरज लागते. मात्र वापरात नसलेल्या वाहनालाही पाच महिन्यात तब्बल 389 लिटर डिझेल भरण्यात आल्याचा अजब पराक्रमही उघडकीस आला आहे. जीए-01-जी-7630 क्रमांकाची  ऊग्णवाहिका वापरात नसतानाही तिच्यात 18 मे 2023 ते 11 सप्टेंबर 2023 या काळात तब्बल 389 लिटर डिझेल भरल्याचे दाखविण्यात आले आहे.

ना हरकत दाखल्यासाठी चिरीमीरी

राज्यात विविध प्रकारच्या आस्थापनांना व्यवसाय करण्यासाठी अग्निशामक दलाकडून ना हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात ऑनलाईन अर्ज केल्यानंतर 15 दिवसांच्या आत दाखला मिळणे आवश्यक आहे. परंतु क्षुल्लक कारणांसाठी अर्ज एक तर नामंजूर करण्यात येतात किंवा तिच प्रक्रिया पुन्हा करण्यास सांगितली जाते, असा आरोप होत आहे. जाणीवपूर्वक अवलंबिलेले हे वेळकाढू धोरण अर्जदारासाठी कंटाळवाणे ठरते. त्यातून नंतर आडमार्गाने लाचेचे प्रकार घडतात. चिरीमीरी हाती पडल्यानंतर काही आस्थापनाला ना हरकत दाखला देण्यात येतो, असाही आरोप होत आहे.

Advertisement
Tags :

.