For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुळीक बांधवांचे पाचवे स्नेहसंमेलन 20 जानेवारीला !

05:32 PM Jan 19, 2024 IST | अनुजा कुडतरकर
मुळीक बांधवांचे पाचवे स्नेहसंमेलन 20 जानेवारीला
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

Advertisement

महाराष्ट्रातील जवळपास 50 ते 60 गावांमध्ये 96 कुळी मराठा मुळीक बांधवांचे वास्तव्य आहे. या मुळीक बांधवांचे पाचवे स्नेहसंमेलन कोकणात आणि विशेषतः सिंधुदुर्गमध्ये प्रथमच मळेवाड हेदुलवाडी येथे ,श्री. गजानन महाराज मंदिरमध्ये शनिवारी 20 जानेवारीला सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत विविध सांस्कृतिक ,सामाजिक, ऐतिहासिक ,कार्यक्रमाने साजरा होणार आहे. तसेच २० व २१ जानेवारीला याच ठिकाणी ऐतिहासिक ,शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरवण्यात येत आहे. हे शस्त्र प्रदर्शन २१ जानेवारीला सर्वांसाठी खुले असणार असून सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. या प्रदर्शनामध्ये शिवकालीन शस्त्रांबाबत माहिती देण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील तसेच गावातील शाळा ,विद्यार्थी व शिवप्रेमी यांनी याचा लाभ घ्यावा असे कळवण्यात आले आहे.या स्नेहसंमेलनामध्ये 20 जानेवारीला सकाळी १० वाजता स्नेहसंमेलनाचे उद्घाटन होणार आहे. स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरवात होणार. त्यानंतर मुळीक बांधवांच्या संगीत भजनाची जुगल बंदी होणार आहे.त्यानंतर ह. भ. प केशव महाराज मुळीक( बारामती ) यांचे सुमधुर आवाजातील कीर्तन आपल्याला ऐकता येईल.त्यानंतर धाकोरा येथील मुळीक भगिनींचा फुगडीचा कार्यक्रम आपल्याला अनुभवता येईल. त्यानंतर मुंबई स्थित भजन महर्षी श्री. चिले बुवा व तळेरेतील नामांकित बुवा श्री.अजित गोसावी, यांची संगीत भजनाची जुगलबंदी होणार आहे. त्यानंतर नामांकित मुळीक बांधवाचा सन्मान व त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहेत.या मेळाव्याचे खास आकर्षण म्हणजे,मळेवाड मुळीकवाडी येथील बाल कलाकारचे लोककलेवर आधारित नाटक सादर होणार आहे .त्यानंतर उपस्थित सर्व मुळीक बांधवाना, पारंपरिक ढोल ताश्या व सनईच्या सुरात श्री. कुलदेवता मंदिरामध्ये आणले जाईल. त्या नंतर मंदिरामध्ये कोकण लोककलेवर आधारित चेंनदवनकर यांचा ट्रिक्ससीन युक्त नाट्यप्रयोग ब्रम्हपदार्थ अर्थात महिमा जगन्नाथ पुरीचा हे नाटक होणार आहे. तसेच उपस्थित मुळीक बांधव यांचा गौरव सोहळा कार्यक्रमाला राज्यभरातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत . मळेवाड -धाकोरा -कोंडुरे यांच्यावतीने हा स्नेह मेळावा सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेतला जात आहे. आतापर्यंत या समाजाचे स्नेह संमेलन कोकणा बाहेर घेतले जात होते. यंदा प्रथमच कोकण विभागाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. या स्नेहसंमेलनमध्ये मुळीक परिवारातील ज्या कोणी उच्च पदवीधर तसेच विशेष कार्य व विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे त्यांनी आपली नावे खालील नंबर वर संपर्क साधून द्यायची आहेत.
डॉ.निलेश मुळीक - 9833756689 श्रीकांत मुळीक -9594995003.

Advertisement
Advertisement
Tags :

.