For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाघवडे रस्त्याचे लवकरच भाग्य उजळणार

11:02 AM Oct 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाघवडे रस्त्याचे लवकरच भाग्य उजळणार
Advertisement

ग्राम विकास आघाडीने घेतली मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट : चार दिवसात रस्ताकाम सुरू करण्याचे आश्वासन

Advertisement

वार्ताहर/किणये

वाघवडे गावच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्याच्या दुऊस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. तसेच वाघवडे गावात थ्री फेज व सिंगल फेज विद्युत पुरवठा सुरळीत नाही. रस्त्याच्या दुऊस्तीचे व विद्युत पुरवठा सुरू सुरळीत करण्यासाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची वाघवडे गावातील ग्रामविकास आघाडी व शेतकऱ्यांनी भेट घेतली. यावेळी अवघ्या चारच दिवसात रस्त्याच्या कामकाजाला सुरू करून, नव्यानेच रस्ता करणार, असे आश्वासन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले असल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

वाघवडे रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सध्या पाऊस पडत असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहते आहे. गावातील वाहनधारकांना या रस्त्यावरून ये-जा करणे मुश्किल बनले होते. त्यामुळे ग्रामविकास आघाडीने मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेऊन सदर रस्त्याची माहिती दिली व रस्ता पूर्णपणे नवीन करून देण्यात यावा, अशी मागणी केली. नागरिकांच्या या प्रŽासाठी आपण अवघ्या चारच दिवसात रस्ता कामाला सुऊवात करू, असे आश्वासन दिले व नुकतेच इंजिनियरना रस्त्याची पाहणी करण्यासाठी  पाठवून दिले. यामुळे रस्ताकामाला लवकरच सुऊवात होणार असल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना वीजपुरवठाही सुरळीत देणार

वाघवडे परिसरात सिंगल फेज व थ्री फेज विद्युत पुरवठा सुरळीत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाला याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकरी वर्गाच्या वतीनेही या संदर्भात निवेदन देण्यात आले. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी याची दखल घेऊन आपण थ्री फेज आणि सिंगल फेज विद्युत पुरवठा सुरळीत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामविकास आघाडीचे कार्यकर्ते व शेतकरी वर्ग उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.