महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणचा प्रसिद्ध जत्रोत्सव 15 पासून

12:18 PM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

20 रोजी पहाटे महारथ मिरवणूक : संस्थान समितीकडून पत्रकार परिषदेत माहिती, जत्रोत्सव यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी

Advertisement

कुंकळ्ळी : फातर्पा येथील प्रसिद्ध श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानचा वार्षिक जत्रोत्सव यंदा सोमवार दि. 15 जानेवारी ते शनिवार 20 जानेवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनिशी साजरा होणार आहे. देवीच्या मूर्तीची महारथातून मिरवणूक 20 रोजी पहाटे काढली जाणार असून जत्रोत्सव यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी चालू आहे. श्रींच्या सर्व भ‹ांनी सहकुटुंब व ा†मत्रमंडळीसह उपस्थित राहून श्रींच्या या उत्सवाचा व कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष कवेंद्र देसाई यांनी फातर्पा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी सचिव ा†वराज देसाई, खा†जनदार दर्शन देसाई, मुखत्यार सुभाष देसाई हे उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्गावरील बाळ्ळीमठ येथून अवघ्या 3 ा†कलोमीटर अंतरावर हे संस्थान वसलेले असून नवसाला पावणारे भा†वकांचे श्रद्धास्थान म्हणून या देवीची ख्याती दूरवर पसरलेली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये तसेच शेजारील राज्यांत देवीचे भ‹गण ा†वखुरलेले असून वार्षिक उत्सवावेळी आपला नवस फेडण्यासाठी ते हमखास हजेरी लावत असतात. राज्यातील हजारो भाविकांबरोबर खास करून कर्नाटकच्या कारवार जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने भाविक लोटत असतात. केवळ हिंदूधर्मियच नव्हेत, तर इतर धर्मियांचा देखील देवीच्या भाविकांमध्ये समावेश होतो. कुंकळ्ळीतील अनेक ख्रिस्तीधर्मिय हे देवीच्या उत्सवांत सहभागी होत असतात, असे कवेंद्र देसाई यांनी सांगितले.

Advertisement

संस्थान समितीकडून जय्यत तयारी

यानिमित्ताने मोठी फेरी भरत असल्याने व्यापारी वर्गासाठी ही जत्रा एक पर्वणीच असते. सर्व प्रकारचे व्यापारी त्यात दुकाने थाटतात. यात शेजारील राज्यांतील व्यापारीही असतात. देवस्थान सा†मतीने भाविकांच्या सुरा†क्षततेच्या दृष्टीने सर्व ती काळजी घेतली असून पाणीपुरवठ्याची व्यवस्था चोख राहावी याकरिता सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी हजर असतील. त्याशिवाय सार्वजनिक बांधकाम खात्याकडून 20 बायो-टॉयलेट्सची सोय केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सुरक्षेच्या दृष्टीने 24 तास पोलीस तैनात असतील. जोडीला देवस्थानकडून सुरक्षा रक्षक ठेवले जाणार आहेत. सीसीटीव्ही पॅमेरे चोहोबाजूंनी लावले जाणार आहेत. भाविकांना सुरळीतपणे रांगेत राहून दर्शन घेता यावे याकरिता चोख व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. तसेच वीज खातेही कसलीच गैरसोय होऊ नये याकरिता 24 तास सेवा देणार आहे. अग्निशामक दलाचा बंब व जवान खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी राहणार आहेत, असे कवेंद्र देसाई यांनी सांगितले. जत्रोत्सव काळात देवस्थानात व सभोवतालच्या परिसरात स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली असून कचरा टाकण्याकरिता पेट्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. कचरा हटविण्याकरिता संस्थान समितीकडून कामगार नेमले जाणार आहेत. कचरा उचलण्याच्या कामी कुंकळ्ळी पालिकेची मदत लाभणार आहे. या समितीच्या आ†धपत्याखाली होणारी ही दुसरी जत्रा असून समितीने ती यशस्वीरीत्या साजरी व्हावी याकरिता जोरदार तयारी चाला†वली आहे, असे कवेंद्र देसाई यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article