For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बड्या बापाच्या बिघडलेल्या औलादींचे रस्त्यावरील कारनामे !

06:03 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
बड्या बापाच्या बिघडलेल्या औलादींचे रस्त्यावरील कारनामे
Advertisement

प्रसिद्धीचे वलय आणि असलेला गडगंज पैसा यामुळे अनेक व्यक्ती या जमिनीवर न चालता हवेत तरंगत असतात. याचा माज आणि नशा एवढी डोक्यात भिनलेली असते की, आपण काय करतोय आणि काही नाही? याचे देखील भान या मंडळीना नसते. यामुळे दाऊ ढोसून रात्रीच्या वेळी रस्ता म्हणजे बापाची जहागिरीदारी असल्यासारखे वाहने चालविण्यास बड्या धेंड्याच्या कार्ट्यांनी सुऊवात केली आहे. मात्र त्यांची नशा आणि मौजमस्तीमुळे कोणाचा तरी जीव जात आहे? याचे सोयरसुतक अमानवी नराधमांना काही एक नसते. अशाच बड्या बापाच्या बिघडलेल्या औलांदीनी रस्त्यावर केलेल्या कारनामांचा घेतलेला एक संक्षिप्त आढावा...

Advertisement

पुणे येथे बड्या बापाच्या बिघडलेल्या अल्पवयीन औलादीला नुकताच न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. तसेच त्याचा ताबा त्याच्या आत्याकडे देण्यास सांगितले. बड्या बापाच्या या बिघडलेल्या अल्पवयीन औलादीने दाऊच्या नशेत महागडी पोर्शे कार चालवित दोघांचा जीव घेतला. विशेष म्हणजे या बिघडलेल्या औलादीला वाचविण्यासाठी पुण्यातील एक आमदार पोलीस ठाण्यात दाखल झाला. तर आपल्या मुलाला वाचविण्यासाठी बड्या बापाने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. अगदी पोलीस यंत्रणा विकत घेण्यापासून ते ससून या सरकारी ऊग्णालयातील डॉक्टरांना बिघडलेल्या औलादीचा अहवाल बदलेपर्यंत यंत्रणा कामाला लावल्या.

मात्र भगवान के घर मे देर है, लेकीन अंधेर नही... ही बातमी बाहेर येताच बड्या बापासह या औलादीला पुन्हा तुऊंगाची हवा खावी लागली, ते मंगळवारी जामीन मिळेपर्यंत. देशांत नैसर्गिक मृत्यूपेक्षा रस्त्यावरील अपघातात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. खुले आम होणारे अपघात नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र, राज्य सरकारपासून ते वाहतूक पोलिसांपर्यंत अनेक समजासेवी संस्था कार्यरत आहेत. मात्र हे फक्त सरकारी यंत्रणा अथवा सामाजिक संस्थेचे काम नसून, ते प्रत्येक नागरिकाचे काम आहे. जर प्रत्येक नागरिकांनी सतर्कता घेतली तर रस्त्यावर होणाऱ्या अपघाताला नक्कीच आळा बसेल. यामुळे अनेक जीव वाचतील. मात्र धनधांडग्या मंडळींच्या बिघडलेल्या औलादींचे काय? रस्ता म्हणजे आपल्या बापाची जहांगिरीदारी असल्यासारखी वाहने चालवित सामान्य नागरिकांना चिरडण्याचे काम हे लक्ष्मीपुत्र करीत आहेत.

Advertisement

अशावेळी कोणी आपल्या नातेवाईकांना भेटायला चाललेले असते, तर कोणी दिवसभर राब-राबून रस्त्याच्या कडेला पथारी टाकुन, आराम करीत असतो. अशांच्या अंगावर वाहने चढवीत पैसा आणि मग्रुरीचे प्रदर्शन या अमानवी नराधमांनी सुरू केले आहे. मात्र यांच्या अंगात असलेली रग आणि माजामुळे जीव जातो तो सामन्यांचा.... पण याचे काही एक सोयरसुतक त्यांच्याच मस्तीत धुंद असलेल्या बड्या मंडळींच्या धेंड्याना नसते. बापाने कमवून ठेवलेली संपत्तीची उधळून करीत, केवळ मज्जा मारायची. मात्र एकदा का कायद्याच्या कचाट्यात सापडले की, नागरिकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत, आपण त्या गावचेच नाहीत असा देखावा करायचा. किंवा राजकीय नेत्यासह सरकारी यंत्रणाना  कामाला लावत आपल्या बिघडलेल्या औलादींना वाचविण्याचे काम करणे. यासाठी समोरच्याच्या जीवाची काही एक किंमत या माजुरड्यांना नसते. अशाच बड्या मंडळींच्या धेंड्यांचे एकेक कारनामे पुढे आल्याने, येथून पुढे तरी अशा बेधुंद वाहने चालविणाऱ्या लक्ष्मीपुत्रांना याचा धडा बसेल, अशी जास्त नाही, पण थोडी आशा वाटते.

नाहीतर, मागचे पाढे पंचावन्न.... अशीच परिस्थिती यापूर्वी आढळल्याने, येथून पुढे काय होईल? हे येणारी वेळच दाखवून देईल. पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पोर्शे अपघात प्रकरणात विशाल अगरवाल या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दाऊच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवित दोघांचा बळी घेतला. मात्र एवढे होऊन देखील अद्यापही अशा घटना कमी होण्याची चिन्हे नाहीत. याऊलट पुणे शहरातच पोर्शे अपघात प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहीते पाटील यांच्या पुतण्याने जोरदार गाडी चालवित एकाला चिरडल्याची घटना घडली. पुण्यातील एकामागून एक अशी अपघातांची मालिका ते ही बड्या बापाच्या मुलांनी केल्याने, सामान्यांचे जीव स्वस्त झालेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे काही पुण्यातच घडले असे नाही. यापूर्वी देखील अशा काही घटना मुंबई शहरात देखील घडल्या आहेत.

9 जून 2015 साली वकील असलेल्या जान्हवी गडकर या महिलेने दाऊच्या नशेत महागडी ऑडी चालवित दोघांचा बळी घेतला होता. घरची परिस्थिती गब्बरगंज असल्याने, लाडात आणि संपूर्ण पैशांत वाढलेली जान्हवी पहिल्यापासून बिनधास्त होती. अशाच बिनधास्तपणे वागण्याने लग्न झाल्यानंतर तिचे आणि पतीचे बिनसले. यामुळे दोघेही वेगवेगळे राहत होते. मात्र उच्चशिक्षित असलेली जान्हवी गडकर महत्वाकांक्षी असल्याने, तिने अनेक कंपनीत काम तर केलेच, मात्र उच्च न्यायालयात वकिलीची

प्रॅक्टीस देखील केली. हॉटेलमध्ये जाऊन मित्रासोबत पार्टी करणे, दाऊ ढोसणे आणि त्यानंतर बेतालपणे गाडी चालविणे. हा तिचा नित्याचा क्रम ठरलेला असायचा. मात्र तिच्या अशा बेताल वागण्यामुळे दोघा निरपराधांचे बळी गेले, आणि जान्हवी गडकर कायद्याच्या कचाट्यात सापडली. यावेळी तिने कुठे, कुठे किती दाऊ ढोसली. यापूर्वी किती पराक्रम केले, अखेर बाहेर येण्यास सुऊवात झाली. म्हणतात ना जैयसे ज्याचे कर्म तैयसे त्याचे फळ अगदी त्याप्रमाणे यापूर्वी केलेल्या कृत्याचे तिला फळ मिळण्यास सुऊवात झाली.

तर, हिट अँड रन केसचा बेताल बादशहा अशी वकिलांच्या गोटात ओळख असलेला तसेच बॉलिवूडचा दंबग अभिनेता सलमान खान याचा पराक्रम तर देशाने नव्हे संपूर्ण जगाने पाहिला आहे. अद्याप त्याची केस न्यायालयात सुरू आहे,  2002 साली प्रसिद्धीच्या झोतात असलेला सलमान खान हा जमिनीवर नसून हवेतच तरंगत होता. मात्र त्याची कायमची नशा उतरली गेली ती त्याने भररात्री रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर झोपलेल्या सामान्य नागरिकांच्या अंगावर गाडी चढवून केलेल्या पराक्रमामुळे. सलमानच्या बेंधुदपणे वागण्याने आणि मद्याच्या नशेने दिवसभर राबलेले देह आरामासाठी पथारी टाकून झोपलेले असतानाच, त्याना कायमचीच चिरनिद्रा मिळाली. त्यानंतर घडलेले नाट्या हे सर्वाना सर्वश्रुत आहे. केवळ प्रसिद्धीचे वलय आणि असलेला गडगंज पैसा यांच्या बळांवर सलमानने अनेकांना फोडण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याच्या बॉडीगार्डची साक्ष त्याच्या मृत्यूनंतर देखील जिवंत राहिली. अन् सत्र न्यायालयाने सलमानला शिक्षा ठोठावली. यातून देखील सहीसलामत सुटण्यासाठी सलमान अद्याप धडपडतो आहे. खुलेआम भररस्त्यात बड्या बापाच्या बिघडलेल्या औलांदीचे जे काही कारनामे सुरू आहेत? ते कारनामे पोलीस कारवायामुळे नक्कीच कमी होतील, अशी अपेक्षा आहे.

- अमोल राऊत

Advertisement
Tags :

.