For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Breaking : राजाराम कारखान्याच्या कार्यकारी संचालकाला बेदम मारहाण! कारखान्याच्या राजकारणात संघर्षाची ठिणगी

08:28 PM Jan 02, 2024 IST | Abhijeet Khandekar
kolhapur breaking   राजाराम कारखान्याच्या कार्यकारी संचालकाला बेदम मारहाण  कारखान्याच्या राजकारणात संघर्षाची ठिणगी
Rajaram Factory
Advertisement

राजाराम कारखान्याचा राजकिय आखाडा तापत असताना आज कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चटणीस यांना शेतकऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना आज कसबा बावड्यात घडली आहे. राजाराम कारखान्याच्या गळीत हंगामात विरोधी गटातील ऊस उत्पादक सभासदांचा ऊस मुद्दाम डावलला जात असल्याचा आरोप करून त्यांना बावड्यातील मुख्य रस्त्यावर मारहाण केली.

Advertisement

राजाराम कारखान्याच्या झालेल्या निवडणूकीत सत्ताधारी महाडिक गटाने बाजी मारली. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले तरीही ऊसतोडीची तारीख पुढे गेल्यानंतरही केवळ विरोधक असल्याचा ठपका ठेऊन ऊस नेला जात नाही असा आरोप सातत्याने शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

यासंदर्भात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यावर दोन वेळा मोर्चे काढून त्यासंदर्भात निवेदनही दिले होते. पण यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे शेतकऱ्यांमध्ये रोष वाढला होता. आजच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयात जाऊन पुन्हा याबाबतचे निवेदन दिले होते. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनीही या निवेदनाची दखल घेऊन कारखाना प्रशासनाकडे विचारणा केली होती.

Advertisement

दरम्यान, आज संध्याकाळी कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस आपले काम आटोपून कसबा बावडा मुख्य मार्गावरून जात असताना पाटील गल्ली समोरच शेतकऱ्यांनी त्यांची गाडी अडवून यासंदर्भात जाब विचारला. यावेळी चटणीस आणि शेतकरी यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कार्यकारी संचालक यांना काही कळण्याच्या आतच गाडीतून बाहेर ओढून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. चिटणीस यांना मारहाण झाल्यानंतर त्यांनी तातडिने पोलीस आयुक्तालयाकडे धाव घेऊन आपली तक्रार नोंदवली.

Advertisement
Tags :

.