For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विद्युतीकरणानंतर धावले इंजिन

06:45 AM Dec 02, 2023 IST | Tarun Bharat Portal
विद्युतीकरणानंतर धावले इंजिन
Advertisement

बेळगाव-बेंगळूर विद्युतीकरणाचे काम पूर्ण

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव-बेंगळूर रेल्वेमार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याने आता या मार्गावर विद्युत इंजिनवर धावणाऱ्या एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. बेळगाव-बेंगळूर एक्स्प्रेस पहिल्यांदाच विद्युत इंजिनवर धावल्याने यापुढील काळात गतीमध्ये वाढ होणार असून प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.

Advertisement

देशातील सर्वच रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण केले जात आहे. वर्षभरापूर्वी लोंढा-धारवाड या मार्गावर विद्युतीकरणावर पहिली एक्स्प्रेस धावली होती. त्यानंतर विद्युतीकरणाची कामे काही ठिकाणी अपूर्ण असल्याने काम सुरू होते. गुरुवारी पहिल्यांदाच बेळगाव-बेंगळूर मार्गावर विद्युत इंजिनच्या साहाय्याने एक्स्प्रेस धावली. बुधवारपर्यंत या एक्स्प्रेसला डिझेल इंजिन जोडण्यात आले होते. मात्र, गुरुवारपासून विद्युत इंजिन जोडल्याने प्रवासाचा कालावधी कमी होणार असल्याचे दिसून येत आहे. एक्स्प्रेस बेळगावमध्ये दाखल झाल्यानंतर प्रवाशांनी स्वागत केले.

Advertisement
Tags :

.