महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘एलसीए’साठी इंजिनची निर्मिती भारतात होणार

06:08 AM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एलसीए मार्क-2 अन् अॅडव्हान्स्ड मीडियम एअरक्राफ्टमध्ये वापरले जाणार : एचएएल तसेच जीईकडून संयुक्तपणे निर्मिती

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) मार्क-2 (तेजस एमके-2) आणि स्वदेशी अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एएमसीए)च्या पहिल्या दोन स्क्वॉड्रन्ससाठी इंजिन आता देशातच तयार होणार आहेत. भारतातील संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे (डीआरडीओ) प्रमुख डॉ. समीर कामत यांनी अमेरिकेतील कंपनी जीई एअरोस्पेस आणि हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) मिळून इंजिन तयार करणार असल्याचे सांगितले आहे. अमेरिकेकडून यासंबंधी मंजुरी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने (सीसीएस) 30 ऑगस्ट रोजी एलसीए मार्क-2 लढाऊ विमानांच्या निर्मितीला मंजुरी दिली होती. हे विमान टप्पाबद्ध पद्धतीने मिराज 2000, जग्वार आणि मिग-29 लढाऊ विमानांची जागा घेणार आहे. एलसीए मार्क-2 ची निर्मिती 2027 पर्यंत करण्यात येणार आहे. एलसीए मार्क-2 लढाऊ विमान प्रकल्पाला सरकारची मंजुरी मिळाली आहे. याकरता डिझाइनर्सला 17.5 टनांचे सिंगल इंजिन एअरक्राफ्ट डिझाइन करावे लागणार असल्याचे एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजेन्सीचे प्रमुख गिरीश देवधरे यांनी सांगितले आहे.

नव्या विमानांवरून भारताची तयारी

डीआरडीओ जीई-414 इंजिनद्वारे एअरक्राफ्ट विकसित करणार आहे. जीई-414, जीई-404 चे अॅडव्हान्स्ड वर्जन आहे. जीई-404 इंजिन सध्या अस्तित्वात असलेल्या एलसीए आणि 83 एलसीए मार्क 1-ए मध्ये वापरण्यात आले आहे. 83 एलसीए मार्क 1-ए पुढील काही वर्षांमध्ये भारतीय वायुदलात सामील होणार आहे. सध्या 30 एलसीए भारतीय वायुदलाच्या सेवेत आहेत. तर दोन विमानांचा वापर एचएएलकडून मार्क 1 ए विकसित करण्यासाठी केला जात आहे.

काही विमाने काश्मीरमध्ये तैनात

30 जुलै रोजी वायुदलाने जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरा वायुतळावर हलके लढाऊ विमान तेजस एमके-1 तैनात केले होते. वैमानिकांना काश्मीर खोऱ्यात उ•ाणांचा सराव मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले गेले होते. काश्मीर क्षेत्र हे चीन आणि पाकिस्तान या शेजारी देशांच्या दृष्टीकोनातून अत्यंत संवेदनशील आहे. वायुदलाकडे सध्या 31 तेजस लढाऊ विमाने आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article