For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सप्टेंबर अखेरीस ‘उमेद’ची हाऊसबोट उतरणार रत्नागिरीच्या खाडीत

01:18 PM Sep 21, 2024 IST | Abhijeet Khandekar
सप्टेंबर अखेरीस ‘उमेद’ची हाऊसबोट उतरणार रत्नागिरीच्या खाडीत
Advertisement

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, उमेदच्या महिलांनी केली सर्व जेटींची तपासणी; महिनाअखेर आधी महिलांना दिला जाणार प्रत्यक्ष हाउढसबोटीचा अनुभव

विभा कदम रत्नागिरी

केरळप्रमाणे रत्नागिरीतील निसर्गरम्य खाड्यांमध्ये हाऊसबोट प्रकल्प येत्या काही दिवसातच प्रत्यक्षात साकारणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस रत्नागिरी जिह्यातील पहिली हाऊसबोट इथल्या खाडीत दाखल होणार आहे. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सुरू असलेल्या उमेद प्रकल्पातील महिलांच्या व्यवस्थापनात या हाऊसबोट रत्नागिरीलगतच्या खाड्यांची सैर घडवणार आहेत. आता रत्नागिरीच्या पर्यटन अध्यायात एक नवीन अध्याय जोडला गेल्याने कांदळवन आणि समुद्रालगतच्या खाडी परिसरातील कोकण लवकरच पर्यटकांना पहायला मिळणार आहे.

Advertisement

सिंधुरत्न योजनेतून आकारला जाणारा आणि महिलांच्या सामर्थ्याला नवी उभारी देणारा हाउढसबोट प्रकल्प येत्या काही दिवसातच प्रत्यक्षात उतरणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पहिली हाऊसबोट रत्नागिरीत येणार आहे. त्या आधी संबंधित महिलांना हाऊसबोटमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. रत्नागिरी जिल्हा हा पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखला जातो. रत्नागिरीत जलपर्यटनावर आधारित व्यवसाय उभे रहावेत, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी या प्रकल्पासाठी उमेदच्या महिलांना नवीन व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

सिंधुरत्न समृद्धी योजनेतून हाऊसबोट प्रकल्पांना 5 कोटींचा निधी
जिह्यातील रत्नागिरी, गुहागर, मंडणगड, राजापूर, दापोली आणि चिपळूण या तालुक्यातील बचतगटाच्या महिलांनी हाउढसबोट प्रकल्पाचा प्रस्ताव सिंधुरत्न समृद्धी योजनेतून सादर केला होता. या प्रस्तावाना मंजुरी मिळून जिह्यातील पाच प्रभागसंघांना हाऊसबोटीसाठी प्रत्येकी 1 कोटीप्रमाणे 5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Advertisement

सुरक्षिततेच्या दृष्टीने खाडीत उभारल्या जाताहेत तरंगत्या जेटी
महाराष्ट्र सागरी मंडळाकडून रत्नागिरीच्या समुद्राविषयीची तांत्रिक माहिती, समुद्रातील सुरक्षितता तसेच व्यवसायाच्या दृष्टीने सहज उपलब्ध जेटी अशा अनेक गोष्टींबाबतीत मार्गदर्शन करण्यात आले. रत्नागिरी तालुक्यातील जयगड खाडीत असलेल्या सैतवडे व राई, दाभोळ खाडीतील वेलदूर आणि फरादे तर चिपळूण खाडीतील मालदोली येथे तरंगत्या जेटी निर्माण करण्यात येत आहेत.

उमेदच्या महिलांसाठी नवीन व्यवसायात मिळणार नवनवीन संधी
जलपर्यटनाच्या माध्यमातून संबंधित परिसरातील महिलांनी आता नवीन व्यवसायाची संधी म्हणून या हाउढसबोट प्रकल्पाकडे पाहण्यास सुऊवात केली आहे. समुद्रकिनारी राहणाऱ्या स्थानिक महिलांना असणारी समुद्राची माहिती या परिसरातील वैशिष्ट्यापूर्ण खाद्यपदार्थ, जवळपासची ऐतिहासिक ठिकाणे, जंगल सफारीसाठी सुरक्षित जागा अशा अनेक गोष्टींची परिपूर्ण माहिती असते. यामुळे या महिलांसाठी जलपर्यटन हा व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

खाडी आणि प्रभाग संघनिहाय हाउढसबोट प्रकल्प

खाडी गाव प्रभागसंघ

जयगड खाडी वाटद जीवनज्योती महिला प्रभागसंघ रत्नागिरी
कोतवडे एकता महिला प्रभागसंघ
दाभोळ खाडी अंजनवेल आनंदी महिला प्रभागसंघ
बुरोंडी पालवी महिला प्रभागसंघ
चिपळूण खाडी मालदोली अग्नीपंख महिला प्रभागसंघ

काही दिवसातच पहिली हाऊसबोट रत्नागिरीत येणार
सिंधुरत्न समृद्धी योजनेतून मंजूर झालेल्या निधीमधून उभारण्यात येत असलेल्या हाउढसबोटींचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. या महिन्याच्या अखेरीस पहिली हाऊसबोट रत्नागिरीत येणार आहे. हा प्रकल्प रत्नागिरीतील पर्यटन क्षेत्रात विशेष भर घालणार आहे. या हाउढसबोटींची प्रसिद्धी करण्यासाठी जिह्यातील सर्वच नामांकित हॉटेल्समध्ये फलक लावण्यात येत आहेत, असे रत्नागिरी जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.