Solapur News : सोलापूर महानगरपालिकेत निवडणूक तयारीची उच्चस्तरीय बैठक पार
सोलापूर महापालिकेत निवडणूक तयारीचा आढावा
सोलापूर : महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने प्रभागनिहाय मतदार यादी, दुबार मतदारांची छाननी, मतदान केंद्र निश्चिती व कंट्रोल चार्ट तयार करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहायक आयुक्त गिरीश पंडित, सह. अभियंता रामचंद्र पेंटर, अधिकारी निकते, संदीप भोसले तसेच सर्व उपतुकडी प्रमुख व तांत्रिक समन्वयक उपस्थित होते. प्रारूप मतदार यादीवरील हरकती व कार्यवाहीचा आढावा दि. २० नोव्हेंबर २०२५ रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली होती.मतदारांकडून ३ डिसेंबर २०२५ पर्यंतप्राप्त झालेल्या हरकती व सुचनांची एकूण संख्या ५५५ असून त्या संबंधित कार्यवाहीचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदार यादीचा कंट्रोल चार्ट अचूकपणे व बिनचूक पूर्ण करणे याबाबत सतत सूचना प्राप्त होत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. कंट्रोल चार्टमध्ये अपलोड नंतर दुरुस्ती शक्य नसल्याने, प्रत्येक तुकडी प्रमुखांनी पूर्ण तपासणी करूनच माहिती अंतिम करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. त्रुटी आढळल्यास उपतुकडी प्रमुखस्वतः जबाबदार राहतील, याची नोंद घेण्याची सूचना करण्यात आली.
संभाव्य दुबार मतदारांबाबत सूचना २९ अशॅक्टोबर २०२५ रोजी राज्य निवडणूक आयोग सचिव यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी संभाव्य दुबार मतदारांची छाननी करण्याबाबत दिशा-निर्देश जारी केले आहेत. निर्देशांची प्रत अधिकारी व समन्वयकांना यापूर्वीच देण्यात आली असून १ नोव्हेंबर २०२५ व २८. नोव्हेंबर २०२५ च्या बैठकीतही त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून सोलापूर महानगरपालिकेला प्रभागनिहाय संभाव्य दुबार मतदार यादी प्राप्त झाली असून प्रत्येक मतदाराचे स्थल सर्वेक्षण करून योग्य कार्यवाही करावी, असा आदेश आयुक्तांनी उपतुकडी प्रमुखांना दिला.