कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सरबजीत यांच्या मारेकऱ्याचा लाहोरमध्ये ‘द एंड’

06:02 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अज्ञाताच्या गोळीबारात गमावला जीव : पाकिस्तानातील भारतविरोधी गुन्हेगारांमध्ये दहशत

Advertisement

वृत्तसंस्था/ लाहोर

Advertisement

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अमीर सरफराज याची ‘अज्ञात हल्लेखोरांनी’ गोळ्या झाडून हत्या केली आहे. अमीर सरफराजनेच आयएसआयच्या इशाऱ्यावर पाकिस्तानच्या तुरुंगात कैद भारतीय नागरिक सरबजीत सिंह यांची हत्या केली होती. पाकिस्तानच्या कोट लखपत तुरुंगात अमीर सरफराजने सरबजीत यांची पॉलिथिनद्वारे गळा आवळून आणि मारहाण करत हत्या केली होती.

अमीर हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जात होता. पाकिस्तानच्या लाहोरमधील इस्लामपुरा भागात दुचाकीस्वार हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या, ज्यात तो गंभीर जखमी झाला होता. सरफराजला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जेथे त्याचा मृत्यू झाला आहे.

डिसेंबर 2018 मध्ये पाकिस्तानी न्यायालयाने सरबजीत सिंह यांच्या हत्येप्रकरणी दोन मुख्य संशयित अमीर सरफराज उर्फ तांबा आणि मुदस्सरची पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्तता केली होती. सर्व साक्षीदार उलटल्याने लाहोर सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला होता.

सरबजीत सिंह हे भारतातील तरनतारन जिल्ह्यातील भिखीविंड गावाचे रहिवासी होते. 30 ऑगस्ट 1990 रोजी ते चुकून पाकिस्तानच्या सीमेत पोहोचले होते. तेथे त्यांना पाकिस्तानी सैन्याने अटक केली होती. यानंतर लाहोर आणि फैसलाबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये सरबजीत यांना गोवण्यात आले होते. या बॉम्बस्फोटांमध्ये 14 जणांचा जीव गेला होता. 1991 च्या बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली सरबजीत यांना मृत्युदंड ठोठावण्यात आला होता. तर सरबजीत यांच्यावर लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात कथित स्वरुपात कैद्यांनी हल्ला केला होता. यानंतर पाकिस्तानने त्यांना ब्रेन डेड घोषित पेले होते.

तत्पूर्वी सरबजीत यांनी पाकिस्तानच्या तुरुंगात असताना भारतात पत्र पाठविले होते. मागील दोन ते तीन महिन्यांमध्ये अन्नामध्ये काहीतरी मिसळून दिले जात आहे. हे अन्न खाल्ल्याने माझ्या शरीरावर प्रतिकूल परिणाम होतोय. हे अन्न एकप्रकारे विषच आहे, असे सरबजीत यांनी पत्रात नमूद केले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article