For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खुद्द वीज खातेच गुंतले बेकायदेशीर भू-रूपांतरात

12:52 PM Aug 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
खुद्द वीज खातेच गुंतले बेकायदेशीर भू रूपांतरात
Advertisement

मुख्य वीज अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस

Advertisement

पणजी : सरकारच्या वीज खात्यानेच पेडणे तालुक्यातील मांद्रे येथे बेकायदेशीर डोंगरकापणी आणि भू-रूपांतर केल्याप्रकरणी पेडणे उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी मुख्य वीज अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस पाठवली असल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणी सुनावणी  5 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वा. होणार आहे. मांद्रे येथे सर्व्हे क्रमांक 276/1 च्या 2495 चौ.मी. जागेत कोणत्याही खात्यांकडून परवाना न घेता सरकारी बांधकाम आणि सुरक्षा भिंत उभारण्यात आल्याची तक्रार मांद्रे येथील शुभम सावंत यांनी पेडणे मामलेदारांना केली. मामलेदारांनी जागेची पाहणी करून पाठवलेल्या अहवालावर पेडणे उपजिल्हाधिक्रायांनी थेट सरकारी वीज खात्यालाच कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत, सदर अधिकाऱ्याने अथवा त्याच्या प्रतिनिधीने सदर बेकायदेशीर कृत्य तात्काळ थांबवण्याचे आणि ही जमीन होती, त्या पूर्वस्थितीत आणण्यास बजावले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.