महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहरात ईद-ए-मिलाद मिरवणूक उत्साहात

11:15 AM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मिरवणुकीला मोठ्या संख्येने उपस्थिती : धर्मगुरुंचा समाजाला उपदेश : मिरवणूक मार्गावर अल्पोपाहार, पाणी, शितपेये, फळे, बिस्किटे देऊन स्वागत

Advertisement

बेळगाव : मुस्लीम धर्मियांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त ईद-ए-मिलाद सण साजरा केला जातो. रविवारी मोठ्या उत्साहात मुस्लीम बांधवांनी भव्य मिरवणूक काढून बेळगावमध्ये ईद-ए-मिलाद साजरी केली. जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या पैगंबरांचा विचार पोचविण्याचा प्रयत्न या मिरवणुकीतून करण्यात आला. सोमवार दि. 16 रोजी देशभर ईद-ए-मिलाद साजरी झाली. परंतु या काळात गणेशोत्सव असल्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊन गणेशोत्सवाला बाधा येऊ नये यासाठी यावर्षीही ईद-ए-मिलादची मिरवणूक पुढे ढकलण्यात आली. बेळगावमध्ये रविवारी ईद-ए-मिलाद सण मोठ्या जल्लोषात साजरा झाला. फोर्ट रोड येथील कर्नाटक चौकात झालेल्या कार्यक्रमाला अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Advertisement

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मुस्लीम बांधवांना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या. याबरोबरच बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, माजी आमदार फिरोज सेठ, पोलीस आयुक्त यडा मार्टीन मार्बन्यांग, उपायुक्त रोहन जगदीश, बाबुलाल पुरोहित यांच्यासह विविध मुस्लीम संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मुस्लीम धर्मगुरुंनी इस्लाम व मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांची समाजाला किती गरज आहे तसेच बंधुभाव किती महत्त्वाचा आहे, याबाबतची माहिती त्यांनी दिली.

बेळगाव शहरासोबतच उपनगरांमध्येही ईद-ए-मिलादचा उत्साह दिसून आला. शहापूर, वडगाव, अनगोळ येथेही मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव एकत्रित आले होते. फोर्ट रोड येथून वाजतगाजत मिरवणुकीला सुरुवात झाली. जुना धारवाड रोडमार्गे आरटीओ सर्कल, राणी चन्नम्मा चौक, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक येथून कॅम्प येथील आसदखान दर्गा येथे मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पेंडाल उभे करून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. तसेच अल्पोपाहार, पाणी, शितपेये, फळे, बिस्किटे देण्यात येत होती. हातात तसेच वाहनांवर मोठे झेंडे लावून तरुणाई मिरवणुकीत सहभागी झाली होती. डीजेच्या तालावर सायंकाळी उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती.

पोलिसांचा कडक बंदोबस्त

मिरवणूक शांततेत पार पडावी, कुठेही वादावादीचे प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांनी मेहनत घेतली होती. मिरवणूक मार्गावर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरवणूक मार्गावरील वाहतूक इतर मार्गे वळविण्यात आली होती. ईद-ए-मिलादमुळे शहराच्या सर्वच भागात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article