For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांगरूळ शिक्षण संस्थेचे शैक्षणिक कार्य आदर्शवत

03:39 PM Dec 17, 2023 IST | Kalyani Amanagi
सांगरूळ शिक्षण संस्थेचे शैक्षणिक कार्य आदर्शवत
Advertisement

संस्थेचा ६५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Advertisement

सांगरूळ प्रतिनिधी

आर्थिक पाठबळ देणारी कोणतीही शैक्षणिक शाखा नसताना सांगरूळ शिक्षण संस्था ग्रामस्थ व शिक्षक कर्मचारी यांच्या सहकार्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण देत आहे .संस्थेचे विद्यार्थी शिक्षणाबरोबरच कला क्रीडा व सामाजिक क्षेत्रातही दैदीप्यमान कामगिरी करत आहेत . संस्थेचे कार्य शिक्षण क्षेत्राला प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी अशोक पाटील यांनी केले .सांगरूळ शिक्षण संस्थेच्या ६५ व्या वर्धापन दिन समारंभात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते .प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोकर व सातारा जिल्ह्याचे लेखा अधिकारी रणजीत झपाटे उपस्थित होते.

Advertisement

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी सांगरुळ शिक्षण संस्थेचे नेतृत्व करणारे आमदार जयंत आसगावकर यांच्या नावातच आस असल्याने संस्थेची झपाट्याने प्रगती होत आहे .भविष्यात संस्थेने आपले नाव उज्वल करावे अशा शुभेच्छा दिल्या.सातारा जिल्ह्य लेखा अधिकारी माननीय रणजीत झपाटे यांनी सांगरुळ शिक्षण संस्था शैक्षणिक, कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात चांगले काम करणारी भावी पिढी घडवत आहे हे अभिमानास्पद असल्याचे सांगितले.

स्वागत व प्रास्ताविक करताना सांगरुळ शिक्षण संस्थेचे सचिव आमदार प्रा जयंत आसगावकर यांनी सांगरुळ शिक्षण संस्थेतील शिक्षक कर्मचारी गुणवंत व प्रामाणिक असल्याने संचालक मंडळामध्ये बहुतांशी सेवानिवृत्त शिक्षकांचा समावेश आहे .संस्था ग्रामस्थ व कर्मचारी यांच्या योगदानातून यशस्वीपणे वाटचाल करत असून .डी डी असगांवकर मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून १८४ विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल झाले आहेत .शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर संस्थेचे नाव उज्वल केले आहे . शिक्षण संस्थाचालक ,शिक्षक ,कर्मचारी ,विद्यार्थी व पालक यांचे एक कुटुंब म्हणून संस्था वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले .
सुरुवातीस संस्थेचा ध्वजाचे ध्वजारोहन दीप प्रज्वलन व संस्थेचे संस्थापक कैसब खाडे ,केदरा नाळे मास्तर व गुरुवर्य स्व . डी डी आासगांवर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केले. यानंतर विविध स्पर्धांमध्ये सुयश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी व कर्मचारी आजी-माजी खेळाडू यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला .

यावेळी संस्थेचे अध्यक्ष य ल खाडे उपाध्यक्ष के ना जाधव गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड शिक्षक नेते दादासाहेब लाड कुंभीचे व्हा चेअरमन विश्वास पाटील संचालक राहुल खाडे निवास वातकर संजय पाटील सविता पाटील इंदुबाई आसगावकर दत्ता पाटील बाबा पाटील यांचे सह संस्थेच्या सर्व शाखांचे शाखाप्रमुख आजी माजी कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते आभार सहसचिव डी एन कुलकर्णी यांनी मानले .सूत्रसंचालन आर बी गोंधळी व एन आर सणगर यांनी केले.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची उपस्थिती

बहुतांशी संस्थांमध्ये शिक्षक कर्मचारी आणि संस्थाचालक यांच्यात वादविवाद असतात. यामुळे कर्मचाऱ्यांनी संस्थाचालक यांच्यात दुरावा निर्माण होत असल्याचे पाहायला मिळते .पण सांगरूळ शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त कर्मचारी वर्धापन दिन कार्यक्रमास नेहमी उपस्थित रहातात. हे संस्थाचालक आणि कर्मचारी यांच्यातील ऋणानुबंध इतरांना प्रेरणादायक आहेत.

Advertisement

.