Karad News : कराडचे शिक्षण क्षेत्र हादरले!
टीईटी परीक्षा दरम्यान पेपरफुटी प्रकरणाने कराडमध्ये खळबळ
सातारा : राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सुरू असताना कोल्हापूरमध्ये उघडकीस आलेल्या पेपरफुटी प्रकरणाने शिक्षण व्यवस्थेत पुन्हा एकदा तीव्र धक्का दिला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट कराड तालुक्यातील मसूरलगतच्या बेलवाडी गावापर्यंत पोहोचल्याने कराडच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बेलवाडीच्या जय हनुमान करिअर अकॅडमीचे संचालकच सूत्रधार असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
एका खोलीत सुरू झालेली ही अकॅडमी आज चार मजली इमारतीत विस्तारित झाली असून या अकॅडमीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कराह पोलिसांनीही चौकशी सुरू केली आहे. कोल्हापूर जिल्हा पोलिसांची विशेष तपास पथकेदेखील कराडमध्ये तपासासाठी दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.
मसूरपासून अवध्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलवाडी गावात महेश गायकवाड हा जप हनुमान अकैडमी बालवतो. त्याचेच नाव या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून पुढे आले आहे. ही अकैडमी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे, विविध पदांवर नोकरी तावणे आणि शैक्षणिक मार्गदर्शन देण्यासाठी परिसरात प्रसिद्ध आहे. मात्र या कामामागे काही गडबड असल्याच्या चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू होत्या, टीईटी पेपरफुटी प्रकरणाने या संज्ञयाला अधिक बळ दिले आहे.
सोळा वर्षापासून कराड तालुक्यातील बेलवाडी येथे जय हनुमान अकॅडमी सुरु आहे. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी या अकॅडमीत प्रवेश घेऊन विविध क्षेत्रात भरती झाले आहेत. सुरुवातीला छोट्याशा इमारतीत सुरु असलेल्या या अकॅडमीचे सपांतर सध्या चार मजली इमारतीत झाले आहे. अलीकडे अकॅडमीने अकरावी आणि बारवी सायन्ससाठी शाखा सुरू केली. जिल्ह्यातनाव असलेल्या या अकॅडमीत अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
मात्र टीईटी पेपर फुटी प्रकरणी या संस्थेचा सचिव महेश गायकवाड याचेच नाव समोर आल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे. किटचा मुख्य सूत्रवार महेश भगवान गायकवाड हा फरार असून त्याचा माज संदीप गायकवाड वाला पोलिसांनी अटक केली आहे. संदीप हा निवृत्त जवान आहे, दोघेही बेलवाडी गावात जय हनुमान करियर अकैडमीचे संचातक आहेत त्यांचा मोठा भाऊ प्रमोद गायकवाड व्यवस्थापन बघती. मात्र तो जिल्हा परिषद निवडणुकीत उतरणार असल्याच्या चर्चा होत्या
मुरगूड पोलिसांच्या तपासातून कटाचा उलगडा टीईटी परीक्षा सुरू असतानाच कोल्हापूर जिल्ह्यात पेपरफुटी उघड झाल्यानंतर मुरगूड पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला. तपासाचा मागोवा घेताना मुख्य संशयित म्हणून महेश गायकवाड (रा. बेलवाडी, ता. कराड) पांच नाव पुढे आल्यानंतर कराड तालुक्यात खळबळ उडाली आहे.