प्रशांत महासागराखाली पृथ्वी दोन तुकड्यांमध्ये विभागतेय
पृथ्वीचा पृष्ठभाग एक विशाल खडकाचा तुकडा नसून अनेक मोठ्या मोठ्या तुकड्यांनी निर्माण झालेला आहे. या तुकड्यांना टेक्टॉनिक प्लेट्स म्हटले जाते, जे हळुहळू फिरत असतात, कधीकधी हे परस्परांना धडकतात, वेगळे होतात किंवा एकाच्या खाली दुसरा जातो. परंतु वैज्ञानिकांनी अलिकडेच एक चकित करणारा शोध लावला आहे.
प्रशांत महासागराखाली पॅनडाच्या व्हँकूवर बेटानजीक एक टेक्टॉनिक प्लेट दोन हिस्स्यांमध्ये विभागत आहे. हे ठिकाण कॅस्केडिया सबडक्शन झोन म्हणून ओळखले जाते. हा झोन स्वत:च्या मृत्यूच्या नजीक पोहोचत असल्याचे नव्या संशोधनातून कळले आहे. यामुळे मोठा भूकंप किंवा प्रलय येणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हे संशोधन सायन्स अॅडव्हान्सेस नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.
टेक्टॉनिक प्लेट्स
पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग म्हणजेच क्रस्ट अनेक प्लेट्समध्ये विभागलेला आहे. हे प्लेट्स तप्त, निम-वितळलेल्या खडकांवर तरंगत असतात. हे प्लेट्स परस्परांमध्ये जोडलेल्या आहेत, परंतु हळूहळू हलत असतात, कधी कधी त्यांच्यात घर्षण होते, कधी ते वेगळे होतात. सर्वात धोकादायक प्रक्रिया सबडक्शन असून तेव्हा एक प्लेट दुसऱ्याच्या खाली सरकते, यामुळे ज्वालामुखी जागृत होत भूकंप होतो.
कॅस्केडिया सबडक्शन झोन प्रशांत महासागराच्या उत्तर हिस्स्यात आहे. येथे चार प्लेट्स मिळतात, एक्सप्लोरर, जुआन डे फ्यूका, पॅसिफिक आणि नॉर्थ अमेरिकन अशी यांची नावे आहेत. एक्सप्लोरर आणि जुआन डे फ्यूका प्लेट्स नॉर्थ अमेरिकन प्लेटच्या खाली सरकत आहे. हे ठिकाण अत्यंत जटिल आहे. सबडक्शन झोन सुरू करणे रेल्वेला पर्वतावर चढविण्यासारखे आहे, याकरता मोठी ऊर्जा लागते. परंतु एकदा सुरू झाल्यावर रेल्वे पर्वतावरून खाली धावण्यासारखा प्रकार असतो आणि तिला थांबवणे अवघड ठरते. ही प्रक्रिया संपविण्यासाठी मोठी दुर्घटना व्हायला व्हावी, म्हणजे रेल्वे रुळावरून घसरण्यासारखा प्रकार असे लुइसियाना स्टेट युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक ब्रँडन शक यांनी सांगितले आहे.
75 किमी लांब फॉल्ट
शक आणि त्यांच्या सहकारी वैज्ञानिकांनी एका जहाजातून सिस्मिक इमेजिंग केले आहे. हे समुद्रतळावरून ध्वनि तरंगांना पाठविण्यासारखे आहे. भूकंपाच्या तरंगांचाही वापर करण्यात आला, यातून
कॅस्केडियाच्या उत्तर टोकाला एक्सप्लोरर प्लेट तुटत असल्याचे कळले. तेथे अनेक मोठे फॉल्ट्स आणि फ्रॅक्चर्स मिळाले आहेत. सर्वात मोठा एक 75 किलोमीटर लांब फॉल्ट असून तो प्लेटला चिरत आहे. हा हिस्सा अद्याप पूर्णपणे वेगळा झालेला नाही. परंतु अत्यंत तणावात आहे. एखाद्या रबर बँडला खेचल्यावर तो तुटण्यासारखी स्थिती आहे. सबडक्शन झोनचा मृत्यू आम्हाला पहिल्यांदाच स्पष्टपणे दिसून येत आहे. हे एकदम बंद होत नसून हळूहळू तुकड्यांमध्ये विभागत आहे, असे शक यांनी सांगितले आहे.
सामान्य प्रक्रिया का धोका?
सबडक्शन झोन तुटणे सामान्य प्रक्रिया वाटते, जर प्लेट्स नेहमीच परस्परांना ढकलत असतील तर भूवैज्ञानिक इतिहास मिटून जाईल. याचमुळे निर्सग याला रोखण्यासाठी प्लेटला तोडतो. तुटलेला हिस्सा मायक्रोप्लेट्स होतो. काही हिस्से आता भूकंपीय स्वरुपात सक्रीय नाहीत, कारण ते मुख्य सिस्टीमपासून वेगळे झाले आहेत. हळूहळू इतका हिस्सा तुटून जाईल की सबडक्शन थांबेल. प्लेटचे वजन कमी होईल. हे स्टेप बाय स्टेप ब्रेकडाउन आहे. ज्वालामुखीय शिखरांचे वय देखील याची पुष्टी देतात असे शक यांचे सांगणे आहे. हे अध्ययन पृथ्वीच्या आतील हालचालींबद्दल माहिती देणारे आहे. यामुळे भूकंप पूर्वानुमान अधिक चांगला होणार आहे. वैज्ञानिक आता आणखी डाटा जमवू शकतील. हा प्रकार रोखणे अवघड आहे,
प्रलय येणार का?
सध्या घाबरण्याची गरज नाही, ही प्रक्रिया मंद असून लाखो वर्षे लागणार आहेत. परंतु प्लेट तुटल्याने छोटे छोटे भूकंप होऊ शकतात, कॅस्केडिया झोनला पूर्वीपासूनच मोठा धोका आहे. 1700 साली येथे 9 तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्यामुळे जपानपर्यंत त्सुनामी पोहोचली होती. जर पूर्ण झोन तुटला तर वॉशिंग्टन, ओरेगन आणि ब्रिटिश कोलंबियात विध्वंस घडू शकतो, परंतु हा मृत्यूचा संकेत असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.