Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
मिरजमध्ये आर्थिक फसवणूक उघडकीस
मिरज : येथील शिक्षण संस्था चालकाला संस्थात्मक कामासाठी सहा टक्के व्याजदराने दहा कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करुन देण्याचे अमिष दाखवून आठ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत शिवानंद आप्पाराया तेलसंग (वय ५४, रा. कमला जगन्नाथ अपार्टमेंट, जिलेबी चौक, ब्राम्हणपूरी, मिरज) यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे.
फसवणूक प्रकरणी संशयीत सुरज वत्तात्रय कणसे (रा. पुणे), उमेश उर्फ अनिल सदाशिव गुरव (रा. बोरगांव, जि. बेळगांव) आणि रोहित दिलीप पोतदार (रा. सहोली, ता. करवीर, जि. कोल्हापूर) अशा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तेलसंग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, खटाव येथे ते शिक्षण संस्था चालवितात. संस्थात्मक कामासाठी त्यांना पैशांची गरज होती.
संशयीत सुरज कणसे, अनिल ! गुरव आणि रोहित पोतदार यांनी शिवानंद तेलसंग यांची भेट घेऊन आपली एएसके इन्व्हेस्टमेंट कंपनी असल्याचे सांगितले. सदर कंपनीच्या माध्यमातून सहा टक्के व्याज वराने दहा कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवले. यासाठी कंपनीची बनावट कागदपत्रे तेलसंग यांना मेलवर पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कर्ज मंजूरी करण्यासाठी तेलसंग यांच्याकडून पैशांची मागणी केली. या अमिषाला बळी पडून तेलसंगी यांनी रोख व ऑनलाईन स्वरुपात आठ लाख रुपये दिले