For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकची दुभाजकाला धडक

10:30 AM May 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकची दुभाजकाला धडक
Advertisement

बेळगाव : ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला ट्रकची धडक बसल्याची घटना सोमवारी रात्री 2 च्या सुमारास घडली. सुदैवानेच यावेळी कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. दुभाजकाला लागूनच पोलीस चौकी आहे. मात्र त्याला कोणताही धक्का बसला नाही. कित्तूर चन्नम्मा चौकाकडून महामार्गाकडे निघालेल्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुभाजकाला ही धडक बसली. यामध्ये दुभाजक व ट्रकचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद उत्तर रहदारी पोलीस स्थानकामध्ये झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.