‘बीइंग एडी’ माहितीपट येतोय
नेटफ्लिक्सने माहितीपट ‘बीइंग एडी’चा ट्रेलर जारी केला आहे. या व्हिडिओ पोस्टसोबत एक कॅप्शनही शेअर करण्यात आली आहे. यात ‘वास्तविक आणि निर्भिड’ असे लिहिले गेले आहे. या माहितीपटाद्वारे एडी मर्फीच्या पूर्ण कारकीर्द प्रवासाला, कामगिरीला दाखविण्यात येणार आहे. ‘बीइंग एडी’चा प्रीमियर 12 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर होणार आहे.
‘बीइंग एडी’ माहितीपटाच्या ट्रेलरमध्ये एडी मर्फीच्या प्रारंभिक कारकीर्दीपासून आतापर्यंतचा अभिनयाचा प्रवास दाखविण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये अनेक प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक आणि गायकही दिसून आले, जे एडी मर्फीविषयी अनेक गोष्टी सांगताना दिसले आहेत. तसेच एडी देखील यात स्वत:बद्दल सांगताना दिसून येतो. या माहितीपटाला दोन अकॅडमी पुरस्कार विजेते दिग्दर्शक एंगस वॉल यांनी तयार केले आहे. एडी मर्फीने स्वत:च्या 40 वर्षांच्या कारकीर्दीत अनेक भूमिका साकारल्या आहेत, पंरतु मर्फी पहिल्यांदाच स्वत:च्या व्यक्तिरेखेत दिसून येतील, असे दिग्दर्शक एंगस वॉल यांनी म्हटले आहे.